Join us   

मुलांना सर्दी- खोकला झाला? उघडा आजीबाईंचा बटवा- ३ पदार्थ करतील औषधांचं काम - त्रास होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 1:19 PM

Only 3 Ingredients For cold- cough to kids: सध्या वातावरणातील बदलामुळे घरोघरी हे दुखणं सुरू आहे. म्हणूनच मुलांना सर्दी- खोकल्याचा, कफचा त्रास झाला तर हा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय करून बघा.. (1 best solution for cold- cough during rainy days)

ठळक मुद्दे १ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा उपाय करावा, असं डॉक्टर सांगत आहेत.

वातावरण थोडंसं जरी बदललं आणि मुलांची काळजी घेण्यात आपण कमी पडलो, तर मुलं लगेच आजारी पडतात. सर्दी- खोकला होतो. तो वाढत गेला तर मग छातीत कफ जमा होतो आणि मग पुढचे अनेक दिवस तो त्रास होत राहतो. शिवाय शाळेत जाणारी जी मुले आहेत ती मुले शाळेतून सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन घेऊन येतात. आणि मग एकाला हा त्रास सुरू झाला की तो हळूहळू घरात सगळ्यांनाच होत जातो. म्हणूनच मुलांचं दुखणं आटोक्यात आणायचं असेल तर हा एक घरगुती उपाय करून बघा (Home remedies for cold- cough to kids). हा उपाय आपल्या आजीबाईंच्या बटव्यातलाच आहे, पण तो एका डॉक्टरांनी सुचवला आहे. १ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा उपाय करावा, असं डॉक्टर सांगत आहेत. (How to cure cold and cough without medicine)

 

सर्दी- खोकला- कफ झाल्यास घरगुती उपाय १. हा उपाय इन्स्टाग्रामच्या dr.nitasha_gupta या पेजवर शेअर करण्यात आला असून तो करण्यासाठी आपल्याला आल्याचा एक छोटासा तुकडा, गुळाचा लहानसा खडा आणि तुळशीची ८ ते १० पाने लागणार आहेत.

मुलांची उंची वाढत नाही म्हणून चिंता वाटतेय? ५ योगासनं दररोज करायला लावा, उंची वाढायला होईल मदत

२. सगळ्यात आधी तर तुळशीची पाने आणि आलं व्यवस्थित धुवून घ्या.

३. त्यानंतर एका किसनीने तुळशीची पाने, आल्याचा तुकडा आणि गुळाचा खडा किसून घ्या.

बाजरीची भाकरी थापतानाच मोडते- तुकडे पडतात? ३ टिप्स- भाकरी होईल छान- फुगेल टम्म

४. आता हा जो एकत्रित केलेला किस आहे, तो व्यवस्थित एका वाटीत घट्ट पिळून घ्या आणि त्या तिन्ही पदार्थांचा रस काढून घ्या.

५. हा रस आता आपल्याला मुलांना चाटवायचा आहे.

 

कोणत्या वयोगटासाठी किती रस द्यावा? १ ते ५ वर्षे या वयोगटातली जी मुले आहेत त्यांना हा रस पाव- पाव चमचा म्हणजेच ४ ते ५ थेंब दिवसातून दोन वेळा द्यावा.

साडीचा पदर झुळझुळत मोकळा सोडायला आवडतो, पण सांभाळता येत नाही? १ स्मार्ट ट्रिक, पदर सावरणं होईल सोपं

जी मुले ६ ते १५ वर्षे या वयोगटातली आहेत, त्यांना हा रस अर्धा- अर्धा चमचा दिवसातून दोन वेळा द्यावा.

मोठ्या व्यक्तीही हा रस घेऊ शकतात. त्यांनी एकेक चमचा रस दिवसांतून दोन वेळा घेतला तरी हरकत नाही. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीलहान मुलंसंसर्गजन्य रोग