आपल्या शरीरात होणारा छोटासा बदल किंवा वेदना ही प्रत्यक्षात दिसत नसली तरी आपल्याला देत असलेला एक प्रकारचा धोक्याचा इशारा असतो. अनेकदा कामाच्या व्यापात आपल्या हातापायांना येणाऱ्या मुंग्या किंवा तळपायांची होणारी आग याकडे दुर्लक्ष करतो. पण रात्री झोपताना किंवा चालताना वारंवार तळपायांची आग होत असेल, सुया टोचल्यासारख्या वेदना होत असतील किंवा पाय बधीर झाल्यासारखे वाटत असतील तर हे फक्त थकव्याचे लक्षण नाही.(High protein and vitamin rich diet for fatigue) या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. पण सगळ्यात मुख्य कारण म्हणजे शरीरातील आवश्यक व्हिटॅमिन्सची कमतरता. (Causes of burning feet at night and treatment) आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्स किंवा पोषण मिळाले नाही तर थकवा जाणवतो. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.(vitamins deficiency) मज्जातंतूंवर परिणाम झाल्यामुळे पायांची जळजळ किंवा मुंग्या येतात. वेळीच लक्ष दिले नाही तर आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी आहारात कोणते पदार्थ असायला हवे पाहूया.
चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग होतील कमी, खोबऱ्याच्या तेलात 'अशी' मिसळा तुरटी; ७ दिवसांत दिसेल फरक
आपल्या मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी १२ महत्त्वाचे आहे. हे जीवनसत्त्व मज्जातंतूभोवती असलेले संरक्षण कवच तयार करण्यास मदत करते. शरीरात बी १२ कमी झाल्यास मज्जातंतु कमकुवत होतात. ज्यामुळे हाता-पायांना मुंग्या येतात. टोचल्यासारखे वाटते किंवा आग होते. तसेच व्हिटॅमिन बी ६, बी १ आणि बी ९ च्या कमतरतेमुळे देखील या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला आहारात रोज एक ग्लास दूध, दही, ताक किंवा पनीर खायला हवे. तसेच अंड्यातील पिवळा भाग खा. ओट्सही आपण खाऊ शकतो. मासे आणि चिकनमधून देखील भरपूर पोषण मिळते.
व्हिटॅमिन बी ६ आपल्या नसांना मजबूत करते. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी आणि ब्रोकोलीमध्ये फोलेट भरपूर असते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. केळी हे व्हिटॅमिन बी ६ चा उत्तम स्त्रोत आहे. यामुळे आपले मज्जातंतूचे कार्य सुरळीत होते. आहारात मूग, मटकी किंवा चणे खा, यामध्ये भरपूर जीवनसत्त्व आणि प्रथिने असतात.
अक्रोड आणि बदाम यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे नसांना होणारी जळजळ कमी करतात. तर अळशीच्या बिया नसांच्या आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी दिवसाला ३-४ लिटर पाणी प्या. जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण कमी होते, त्यामुळे त्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ आणि शेंगदाणे खा, ज्यामुळे पायांची जळजळ कमी होऊ शकते.
Web Summary : Burning feet and tingling may signal vitamin deficiencies. Consume dairy, eggs, leafy greens, nuts, and flaxseeds. Drink water, limit caffeine, and eat jaggery with peanuts for relief.
Web Summary : पैरों में जलन और झुनझुनी विटामिन की कमी का संकेत हो सकता है। डेयरी, अंडे, पत्तेदार सब्जियां, नट्स और अलसी खाएं। पानी पिएं, कैफीन सीमित करें और गुड़ के साथ मूंगफली का सेवन करें।