Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवाळीचा फराळ जास्त झाल्याने अजूनही पोट बिघडलेलंच? ३ उपाय- गॅसेस, ॲसिडीटी कमी होईल

दिवाळीचा फराळ जास्त झाल्याने अजूनही पोट बिघडलेलंच? ३ उपाय- गॅसेस, ॲसिडीटी कमी होईल

Home Remedies For Bloating and Acidity: दिवाळीचा फराळ झाल्यानंतर बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तो कमी करण्यासाठी काही सोपे उपाय...(how to reduce bloating and acidity?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2025 15:29 IST2025-10-25T15:29:01+5:302025-10-25T15:29:49+5:30

Home Remedies For Bloating and Acidity: दिवाळीचा फराळ झाल्यानंतर बऱ्याच जणांना हा त्रास होतो. तो कमी करण्यासाठी काही सोपे उपाय...(how to reduce bloating and acidity?)

home remedies for bloating and acidity, how to get rid of stomach upset, how to reduce bloating and acidity | दिवाळीचा फराळ जास्त झाल्याने अजूनही पोट बिघडलेलंच? ३ उपाय- गॅसेस, ॲसिडीटी कमी होईल

दिवाळीचा फराळ जास्त झाल्याने अजूनही पोट बिघडलेलंच? ३ उपाय- गॅसेस, ॲसिडीटी कमी होईल

दिवाळीमध्ये प्रत्येकाच्याच घरी भरपूर फराळाचे पदार्थ केले जातात. शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू या सगळ्यांवर यथेच्छ ताव मारला जातो. एरवी एवढं सगळं तळलेलं, तुपकट, तेलकट खाण्याची सवय नसते. पण दिवाळीत पोटापेक्षा जास्तच खाल्लं जातं. शिवाय पाहुणे, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यासोबत गप्पा मारत जेवणही अगदी भरपेट केलं जातं. या सगळ्याचा व्हायचा तो त्रास होतो आणि मग दिवाळी सरली तरी बिघडलेलं पोट काही नीट होत नाही. असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..(how to reduce bloating and acidity?)

पोट बिघडलं असेल, गॅसेस, अपचन होत असेल तर काय करावं?

 

१. ओवा

पचनासंबंधीचे कित्येक त्रास कमी करण्यासाठी ओवा अतिशय गुणकारी ठरतो. ओव्यामध्ये असणारा थायमॉल हा घटक पोटातला गॅस मोकळा करतो.

व्यायाम, डाएट करूनही वजन कमी होत नाही? एक्सपर्ट सांगतात ४ चुका टाळा- वजन उतरेल भराभर

त्यामुळे १ टीस्पून ओवा अगदी बारीक चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या. हे पाणी दिवसातून २- ३ वेळा प्यायलं तरी चालेल. पोटाचा त्रास कमी होईल.

 

२. जिरे आणि लिंबूपाणी

ओव्याप्रमाणेच जिरेही अतिशय पाचक असतात. हा उपाय करण्यासाठी १ ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाका. यानंतर त्यात थोडीशी जिरेपूड आणि थोडं काळं मीठ घालून प्या.

गळणाऱ्या केसांमुळे वैताग आला? ५ फळं खा- केसांची मुळं पक्की होऊन वाढतील भराभर

हे पाणीही दिवसातून दोनदा प्यायलं तरी चालेल. गॅसेस मोकळे होऊन पचन सुधारेल.

 

३. ताक आणि हिंग

हिंग आणि ताक हे दोन्ही पदार्थ तुमचं बिघडलेलं पोट चांगलं करण्यास मदत करतील. यासाठी ताजं दही घेऊन पातळ ताक करा.

आंघोळीच्या आधी मुलतानी मातीचा 'असा' उपाय करा, दिसाल तरुण-साबण नको की फेसवॉश नको

त्यामध्ये काळं मीठ, जिरेपूड घाला आणि सगळ्यात शेवटी अगदी ताक पिण्याच्या वेळी त्यात चिमूटभर हिंग घाला. सगळं ताक व्यवस्थित हलवून मग ते प्या. हिंग घातलेल्या ताकामुळेही पोटाला लगेचच आराम मिळेल. 
 

Web Title : दिवाली के पकवानों से परेशान? गैस और एसिडिटी के लिए 3 घरेलू उपाय।

Web Summary : दिवाली के पकवानों का अधिक सेवन? अजवाइन, जीरा-नींबू पानी, या हींग के साथ छाछ से पाचन को आसान बनाएं। ये सरल उपाय उत्सव के बाद गैस, सूजन और एसिडिटी से राहत दिला सकते हैं।

Web Title : Diwali food hangover? 3 home remedies for gas and acidity.

Web Summary : Overindulged in Diwali treats? Ease digestion with ajwain, cumin-lemon water, or buttermilk with asafoetida. These simple remedies can relieve gas, bloating, and acidity after festive feasting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.