सफरचंद आरोग्यासाठी उत्तम आहे, हे आपल्याला माहितीच आहे. 'An apple a day keeps the doctor away' ही ओळही आपण अगदी शाळेत असल्यापासून वाचत आलेलो आहोत. शिवाय लवंगही गुणकारी आहेच. सर्दी, घसादुखी, खोकला असा त्रास सुरू झाल्यावर सगळ्यात आधी लवंगच आठवते. मुळात सफरचंद आणि लवंग या दोन्हींचे फायदे आपल्याला माहिती असले तरी ते दोन्ही पदार्थ एका खास पद्धतीने एकत्र करून खाल्ले तर अधिक गुणकारी ठरू शकतात, हे मात्र आपल्यापैकी खूपच कमी लोकांना माहिती आहे. ही नेमकी काय गोष्ट आहे आणि त्यामुळे कोणकोणते आजार अगदी बरे होऊ शकतात ते पाहा..
सफरचंदावर लवंग खोचून खाण्याचे फायदे
हल्ली सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ शेअर होत असतात. त्यातले काही आरोग्याविषयीचेही असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ medimanch या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की सफरचंदामध्ये जर लवंग खोचून तुम्ही ४० दिवस ते नियमितपणे खाल्लं तर मायग्रेनचा त्रास तुमचा कायमचा कमी होऊ शकतो. हा उपाय केल्याने ॲसिडीटीही होत नाही. ज्या व्यक्तींना ॲसिडीटी किंवा मायग्रेनचा त्रास नेहमीच होतो, त्या व्यक्तींनी काही दिवस हा उपाय केल्यानंतर त्यांना आलेले अनुभवही त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत.
हा उपाय करण्यासाठी एक सफरचंद घ्या. त्या सफरचंदावर ८ ते ९ लवंग खोचा. लवंगचं फूल वरच्या दिशेने राहील अशा पद्धतीने त्या खोचाव्या.
मुलं सतत चॉकलेट, गोड मागतात? राणी मुखर्जी सांगते उपाय, तिची मुलगी रसगुल्ले मागायची तेव्हा...
रात्री अशा पद्धतीने लवंग खोचून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशीपोटी ते सफरचंद लवंगांसकट बारीक चावून खा. लवंग खोचलेलं हे सफरचंद तुम्ही फ्रिजमध्ये किंवा फ्रिजच्या बाहेरही ठेवू शकता. मायग्रेन आणि ॲसिडीटीचा खूप त्रास असेल आणि हा उपाय आवडला असेल तर काही दिवस करून पाहायला हरकत नाही.