Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कितीही दमलो तरी रात्री डोळ्याला डोळा नाही? अंथरुणावर पडताच गाढ झोप येण्यासाठी १० मिनिटांचा सोपा उपाय

कितीही दमलो तरी रात्री डोळ्याला डोळा नाही? अंथरुणावर पडताच गाढ झोप येण्यासाठी १० मिनिटांचा सोपा उपाय

Home Hacks for Sound Sleep in Night: रात्री शांत झोप येत नसेल तर हा एक सोपा उपाय करून पाहू शकता..(how to get rid of sleepless nights?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2026 14:53 IST2026-01-25T09:33:06+5:302026-01-27T14:53:36+5:30

Home Hacks for Sound Sleep in Night: रात्री शांत झोप येत नसेल तर हा एक सोपा उपाय करून पाहू शकता..(how to get rid of sleepless nights?)

home hacks for sound sleep in night, how to get rid of sleepless nights, best remedies for sound sleep  | कितीही दमलो तरी रात्री डोळ्याला डोळा नाही? अंथरुणावर पडताच गाढ झोप येण्यासाठी १० मिनिटांचा सोपा उपाय

कितीही दमलो तरी रात्री डोळ्याला डोळा नाही? अंथरुणावर पडताच गाढ झोप येण्यासाठी १० मिनिटांचा सोपा उपाय

Highlightsकाही दिवस हा उपाय नियमितपणे करून पाहा. खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं माधवी सांगते.

आपल्यापैकी बरेच जण असे आहेत ज्यांना रात्री लवकर झोपच येत नाही. दिवसभर त्यांनी खूप काम केलेलं असतं. शारिरीक थकवा जसा आलेला असतो तसाच मानसिक थकवाही आलेला असतो. लवकर झोप लागली तर आराम होईल, थोडं रिलॅक्स होईल असं त्यांना वाटत असतं. पण तरीही रात्री झोप काही लागत नाही. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर कधीतरी डोळा लागतो, पण शांत झोप होत नाही. याचा परिणाम मग दुसऱ्या दिवशीच्या कामावरही होतोच. शिवाय असंच जर रोज होत असेल तर त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. म्हणूनच रात्री पुरेशी आणि शांत झोप होणं खूप गरजेचं आहे (home hacks for sound sleep in night). त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहा...(how to get rid of sleepless nights?)

 

रात्री शांत झोप होण्यासाठी काय करावं?

रात्री शांत झोप होण्यासाठी काय उपाय करता येईल याविषयीची माहिती अभिनेती माधवी नेमकरने सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते की रात्री झोपण्याच्या आधी फक्त १० मिनिटे हा उपाय करा. यासाठी बेडवर पाठ टेकवून झोपा.

गुलाबाच्या रोपावर बारीक किडे, मुंग्या दिसतात? पानांनाही छिद्रं पडली? ४ उपाय- रोप पुन्हा जोमात वाढेल

पण असं करताना तुमची मान बेडच्या खाली झुकली पाहिजे. तिने हा उपाय सोफ्यावर करून दाखवला असला तरी आपण बेडवर झोपूनही हा उपाय करू शकतो. यामुळे मेंदूला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होईल. त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला लवकर आणि शांत झोप लागेल. काही दिवस हा उपाय नियमितपणे करून पाहा. खूप चांगला परिणाम दिसून येईल, असं माधवी सांगते.


 

हे उपायही करून पाहा..

१. रात्रीच्या वेळी मोबाईलपासून दूर राहा. झोपण्याच्या १ तास आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप अशी कोणतीही स्क्रिन पाहू नका. त्याऐवजी एखादं शांत पुस्तक वाचा.

मुलाने 'हा' प्रश्न विचारला आणि जेनेलिया डिसुझाने मांसाहार सोडूनच दिला, तेव्हापासून झाली पूर्णपणे वेगन...

२. ज्या लोकांना निद्रानाशाचा त्रास असतो, त्यांनी संध्याकाळी ६ नंतर चहा, कॉफी घेणं टाळायला हवं. कारण त्यामुळे एन्झायटी वाढते आणि त्याचा झोपेवर परिणाम होतो.

३. रात्री झोपण्यापुर्वी हळद आणि जायफळ घालून दूध घेतलं तरी त्याचा झोपेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो. 

Web Title : देर रात तक नींद नहीं आती? 10 मिनट में पाएं गहरी नींद

Web Summary : क्या आपको सोने में परेशानी होती है? माधवी नेमकर ने पीठ के बल लेटकर सिर को थोड़ा नीचे रखने का सुझाव दिया है, जिससे रक्त प्रवाह बेहतर होता है और नींद अच्छी आती है। सोने से पहले स्क्रीन और कैफीन से बचें। हल्दी और जायफल वाला गर्म दूध पिएं।

Web Title : Can't Sleep Late? A 10-Minute Trick for Sound Sleep

Web Summary : Struggling to fall asleep? Madhavi Nemkar suggests lying on your back with your head slightly lowered for 10 minutes to improve blood flow and promote restful sleep. Avoid screens and caffeine before bed. Try warm milk with turmeric and nutmeg for better sleep.