Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Home Cleaning Tips : किचनच्या नळांचा गंज २ मिनिटात निघेल; साफसफाई करताना वापरा गंज काढण्याच्या सोप्या टिप्स

Home Cleaning Tips : किचनच्या नळांचा गंज २ मिनिटात निघेल; साफसफाई करताना वापरा गंज काढण्याच्या सोप्या टिप्स

Home Cleaning Tips : . जर तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरातील नळांचा गंज काढून टाकायचा असेल  तर या टिप्स आणि हॅकचा अवलंब करून तुम्ही काही मिनिटांत नळातील गंज सहजपणे काढून टाकू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 15:40 IST2021-10-29T15:18:32+5:302021-10-29T15:40:50+5:30

Home Cleaning Tips : . जर तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरातील नळांचा गंज काढून टाकायचा असेल  तर या टिप्स आणि हॅकचा अवलंब करून तुम्ही काही मिनिटांत नळातील गंज सहजपणे काढून टाकू शकता.

Home Cleaning Tips : How to remove rust from kitchen tap | Home Cleaning Tips : किचनच्या नळांचा गंज २ मिनिटात निघेल; साफसफाई करताना वापरा गंज काढण्याच्या सोप्या टिप्स

Home Cleaning Tips : किचनच्या नळांचा गंज २ मिनिटात निघेल; साफसफाई करताना वापरा गंज काढण्याच्या सोप्या टिप्स

आपल्या संपूर्ण घरात अशा अनेक वस्तू असतात ज्या गंजून खराब झाल्यानं त्याचा रंग उडालेला असतो. तर काही ठिकाणी फरशीवर गंजाचे डाग दिसून येतात. धातू सतत पाण्याच्या संपर्कात आल्यानं वस्तू गंजायला सुरूवात होते. अशा स्थितीत स्वयंपाकघरातील नळांना सर्वाधिक गंज लागतो हे नक्की. जर तुम्हालाही तुमच्या स्वयंपाकघरातील नळांचा गंज काढून टाकायचा असेल  तर या टिप्स आणि हॅकचा अवलंब करून तुम्ही काही मिनिटांत नळातील गंज सहजपणे काढून टाकू शकता, तर चला जाणून घेऊया कसं ते. (Home Cleaning Tips )

हायड्रोजन पेरॉक्साईड (Hydrogen Peroxide)

हायड्रोजन पेरोक्साइड हा असाच एक पदार्थ आहे ज्याच्या मदतीने तुम्ही गंज सहज काढू शकता. यासाठी, प्रथम तुम्ही एका स्प्रे बाटलीमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड भरून नळावर चांगले स्प्रे करा आणि सुमारे 10 मिनिटे सोडा. 10 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रश किंवा सॅंडपेपरच्या मदतीने ते चांगले घासून घ्या. चोळल्यानंतर पाण्याने पुसून टाका. तुम्हाला दिसेल की गंज निघून गेला आहे.

केस कोरडे झालेत, फार गळतात? जावेद हबीबनं सांगितला दाट केसांसाठी बेस्ट उपाय; स्पा करण्याची काही गरज नाही

लिंबू आणि गरम पाणी (Lemon and hot water)

लिंबू आणि कोमट पाण्याच्या मदतीने तुम्ही स्वयंपाकघरातील नळावर पडलेला हट्टी गंज सहजपणे काढून टाकू शकता. यासाठी प्रथम मिश्रण तयार करा. मिश्रण तयार केल्यानंतर ते गंजलेल्या भागावर चांगले फवारावे आणि काही वेळाने ब्रशने घासून स्वच्छ करा. एकदा साफसफाई केल्यानं गंज निघत नसल्यास, आपण प्रक्रिया पुन्हा करू शकता. या मिश्रणात तुम्ही मीठ देखील वापरू शकता.

बेकींग सोडा (Baking soda)

बेकिंग सोडा हा असाच एक पदार्थ आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही गंज सहज काढू शकता. यासाठी दोन ते तीन चमचे लिंबाचा रस तीन ते चार चमचे बेकिंग सोडा घालून घट्ट द्रावण तयार करा. यानंतर, ही पेस्ट या गंजलेल्या भागावर लावा आणि काही काळ राहू द्या. काही वेळाने सॅंडपेपर किंवा क्लिनिंग ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. गंज काढून टाकल्यानंतर, एकदा पाण्याने स्वच्छ करा.

फक्त ब्रा घालून मॉडेल करतेय मंगळसुत्राची जाहिरात; सब्यसाचीच्या 'त्या' जाहिरातीवर नेटकरी संतापले

लिंबू आणि मिठाचा वापर (lemon and salt)

कोणताही गंज काढण्यासाठी तुम्ही चुना, लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण वापरू शकता. लिंबाचा रस मीठ क्रिस्टल्स सक्रिय करतो आणि कोणत्याही गंजाला मऊ बनवून काढून टाकण्यास सोपे करतो. अशा स्थितीत, नळावरील गंज काढून टाकण्यासाठी तुम्ही हे मिश्रण वापरू शकता. हे मिश्रण गंजलेल्या भागावर लावल्यानंतर काही वेळाने क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करा नंतर सामान्य पाण्याने स्वच्छ करा.

Web Title: Home Cleaning Tips : How to remove rust from kitchen tap