सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही सामान्य समस्या बनली आहे.(High bp problem) याचे सगळ्यात मोठे कारण तणाव, चिंता, राग, झोपेची कमतरता, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागची मुख्य कारणे आहेत.(High bp Natural treatment) जर रक्तदाब हा वेळेवर नियंत्रित झाला नाही तर आपल्या हृदयावर त्याचा वाईट परिणाम होतो. (tips to manage blood pressure)
उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.(High bp stress solution) त्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जर आपल्याला औषधांशिवाय रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर ३ सोपे उपाय करुन पाहा. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहिल.
डोके दुखतं, उदासही वाटतं, लगेच थकता... दुर्लक्ष नको! वेळीच व्हा सावध, 'या' आजाराचा गंभीर धोका
1. ताण आणि चिंता ही उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक विश्रांती घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला दिवसभराच्या कामात लहान ब्रेक घेणे गरजेचे आहे. खोल श्वास घ्या आणि शांत वातावरणात थोडा वेळ घालवा. तसेच १० ते १५ मिनिटे ध्यान करा. प्राणायम करा तसेच गाणी ऐकू शकता. आपल्या आवडीचे पुस्तक देखील वाचू शकता.
2. डॉक्टर म्हणतात की खाण्याच्या सवयी आपल्या हृदयावर आणि रक्तदाबावर थेट परिणाम करतात. त्यासाठी तळलेले, प्रक्रिया केलेले आणि जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा. याऐवजी आपल्याला निरोगी पदार्थ खायला हवे. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, बेरी, ओट्स, दही, जवस इत्यादी पदार्थांचे सेवन करा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहिल. तसेच भरपूर पाणी प्या. जेवण वगळू नका. पुरेसा आहारा घ्यायला हवा.
3. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी व्यायाम आणि योगासने करा. व्यायामामुळे आपले शरीर केवळ तंदुरुस्त राहत नाही तर ताण आणि रक्तदाब देखील नियंत्रित राहतो. आपल्या दैनंदिन जीवनशैलीत ३० मिनिटे चाला. सायकलिंग किंवा जॉगिंग करा. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी यष्टिकासन, पर्वतासन, पवनमुक्तासन असे योगासने करा.