Join us

शुगर वाढल्याची लक्षणं ‘अशी’ दिसतात मानेवर, पाहा एकदा तुमची मान अशीच तर दिसत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:41 IST

Diabetes Symptoms : इन्सुलिन हार्मोन शरीरातील शुगर कंट्रोल करतात. त्यामुळे जर इन्सुलिन कमी झालं किंवा योग्यपणे काम करत नसेल तर शरीरात शुगर वाढते.

Diabetes Symptoms : डायबिटीस एक गंभीर आणि आयुष्यभर सोबत राहणारा आजार आहे. शरीर इन्सुलिन हार्मोन्स योग्यपणे तयार करू शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाही. ज्यामुळे रक्तात शुगर वाढते. इन्सुलिन हार्मोन शरीरातील शुगर कंट्रोल करतात. त्यामुळे जर इन्सुलिन कमी झालं किंवा योग्यपणे काम करत नसेल तर शरीरात शुगर वाढते. अशात शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं नुकसान होतं. 

काय आहे डायबिटीस?

डायबिटीस झाला की नाही हे ब्लड टेस्टच्या माध्यमातून कळतं. जास्तीत जास्त लोकांमध्ये डायबिटीसची कॉमन लक्षणं जसे की, जास्त तहान लागणे, जास्त लघवी येणे इत्यादी दिसतात. पण अजब लक्षणं शरीर आधीच दाखवू लागतं.

डायबिटीसची लक्षणं कधीही सरळ आणि स्पष्ट नसतात. काही लक्षणं हळूहळू दिसू लागतात. त्यामुळे शरीरात कोणतीही छोटी समस्याही झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच टेस्ट करून योग्य ते उपाय करायला हवेत.

मानेची त्वचा काळी आणि जाड होणे

एका रिपोर्टनुसार, मानेवरील त्वचा किंवा काखेतील त्वचा काळी आणि मखमली होते. याला Acanthosis Nigricans म्हणतात. हे शरीरातील इन्सुलिनच्या जास्त प्रमाणामुळे होतं.

सतत इन्फेक्शन किंवा दृष्टी कमी होणे

डायबिटीसमुळे इम्यून सिस्टीम कमजोर होतं, ज्यामुळे पुन्हा पुन्हा यूरिन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन किंवा स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. त्याशिवाय ब्लड शुगर वाढल्यानं डोळ्यांच्या लेन्समध्ये सूज येऊ शकते. अशात धुसर दिसतं किंवा फोकस करण्यास समस्या येते.

चक्कर येणे, बेशुद्ध पडणे आणि मूड बदलणे

शरीरात पाणी झाल्यावर मेंदुला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला चक्कर येऊ लागते, थकवा जाणवतो. त्याशिवाय ब्लड शुगर अचानक वाढणं किंवा कमी झाल्यानं मूड बदलतो. इन्सुलिन योग्य प्रमाणात नसल्यानं चिडचिडपणा, राग किंवा निराश वाटू शकतं.

खाज, झिणझिण्या आणि हात किंवा पायांमध्ये वेदना

ब्लड शुगर वाढल्यानं नसांचं नुकसान होतं, ज्यामुळे हात-पायांवर झिणझिण्या, खाज किंवा जळजळ होऊ शकते. नसांचं नुकसान होत असल्यानं पायांमध्ये जळजळ, झिणझिण्या किंवा वेदना होतात. याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हटलं जातं.

श्वासातून गोड किंवा नेल पॉलिशसारखा गंध येणे

शरीरात फॅट बर्न होत असताना केटोन नावाचं अ‍ॅसिड तयार होतं, ज्यामुळे श्वासातून फ्रूटी किंवा अॅसिटोनसारखा गंध येतो. याला Diabetic Ketoacidosis म्हणतात, जी एक फार घातक स्थिती आहे.

डायबिटीसची सामान्य लक्षणं

डायबिटीस झाल्यावर लाळ कमी तयार होते, ज्यामुळे तोंड कोरडं पडतं. त्यामुळे दात आणि हिरड्यांमध्ये इन्फेक्शनचा धोका वाढतो. त्याशिवाय जेव्हा पोटातून अन्न आतड्यांमध्ये योग्यपणे पोहोचत नसेल तर मळमळ, पोट फुगणे किंवा उलटी होऊ शकते. या गोष्टी डायिबिटीक न्यूरोपॅथीमुळे होतात. तसेच पुन्हा पुन्हा लघवी लागणे, जास्त तहान लागणे, भूक वाढणे, थकवा आणि दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणांकडे अजिबात दु्र्लक्ष करू नका.

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्स