Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तिसाव्या वाढदिवसानंतर अजिबात करु नका ‘या’ गोष्टी, हाय ब्लडप्रेशरने ऐन तारुण्यात जीवाला धोका

तिसाव्या वाढदिवसानंतर अजिबात करु नका ‘या’ गोष्टी, हाय ब्लडप्रेशरने ऐन तारुण्यात जीवाला धोका

High Blood Pressure : तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर हाय बीपीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 20:21 IST2025-06-28T12:36:53+5:302025-06-28T20:21:35+5:30

High Blood Pressure : तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर हाय बीपीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.

High blood pressure becomes the cause of heart attack and stroke you should be careful | तिसाव्या वाढदिवसानंतर अजिबात करु नका ‘या’ गोष्टी, हाय ब्लडप्रेशरने ऐन तारुण्यात जीवाला धोका

तिसाव्या वाढदिवसानंतर अजिबात करु नका ‘या’ गोष्टी, हाय ब्लडप्रेशरने ऐन तारुण्यात जीवाला धोका

High Blood Pressure : बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य समस्या असल्याचं त्यांना वाटतं. पण त्यांना हे माहीत नसतं की, ही समस्या जर कंट्रोल केली नाही तर हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो. इतकंच काय तर असेही भरपूर लोक असतात ज्यांना हेही माहीत नसतं की, ते लो बीपी किंवा हाय बीपीचे शिकार आहेत. तुम्ही सुद्धा अशा लोकांपैकी असाल तर हाय बीपीला अजिबात हलक्यात घेऊ नका. कारण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. तुम्ही हेही लक्षात घेतलं पाहिजे की, दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर सगळ्यात आधी ब्लड प्रेशर चेक करतात, ते हे काही उगाच करत नाहीत.

आयसीएमआरनुसार, भारतात प्रत्येक चार वयस्क व्यक्तींपैकी एकाला हाय ब्लड प्रेशरची  समस्या आहे. पण त्यातील केवळ अर्ध्या लोकांनाच याची माहिती आहे आणि केवळ १२ टक्के लोकच याला कंट्रोल ठेवू शकतात.

डॉक्टरांनुसार हाय ब्लड प्रेशरचा अर्थ 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा अधिक रीडिंग येणं. हाय ब्लड प्रेशरची कारणं वेगवेगळी असू शकतात. ज्यात तुमची फॅमिली हिस्ट्री, लठ्ठपणा, मद्यसेवन, धुम्रपान, अनहेल्दी आहार आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी कमी करणे यांचा समावेश आहे. 

हाय ब्लड प्रेशरनं धोका

एक्सपर्ट सांगतात की, हाय ब्लड प्रेशर हा आजारा सायलेंट किलर मानला जातो. त्यामुळे हा जास्त घातक आहे. हाय बीपीमुळे शरीरात हळूहळू नुकसान होत. पुढे जाऊन ब्रेन स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक, किडनी फेल, पेरिफेरल वस्कुर डिसीज आणि दृष्टी जाणे अशा गंभीर समस्या होऊ शकतात. अनकंट्रोल हायपरटेंशनमुळे मेंदुमध्ये ब्लड क्लॉटिंग किंवा ब्लीडिंग होण्याचा धोका वाढतो. जर नियमितपणे ब्लड प्रेशर चेक केलं तर भारतात ५० टक्के ब्रेन स्ट्रोकच्या केसेस कमी केल्या जाऊ शकतात.

किती ब्लड प्रेशर घातक

ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवण्यासाठी सगळ्यात सोप बाब म्हणजे नियमितपणे बीपी चेक करत रहा. ३० वय ओलांडलं की तुम्ही नियमितपणे बीपी चेक केला पाहिजे. तुम्ही याची मशीन घरी सुद्धा आणू शकता. नॉर्मल ब्लड प्रेशर 120 / 80 mmHg, बॉर्डर लाइन 120–139 / 80–89 mmHg बीपी स्टेज- 1 140–159 / 90–99 mmHg, बीपी स्टेज- 2  160–179 / 100–109 mmHg, बीपी स्टेज- 3 180+ / 110+ mmHg  आहे. 

हाय ब्लड प्रेशर कसं कंट्रोल कराल?

वयाची तिशी ओलांडली की, सगळ्यांनी ब्लड प्रेशरकडे अजिबात कानाडोळा करू नये. यासाठी रोज ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. नियमितपणे वेगवेगळी फळं आणि भाज्या खाव्यात. सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, तंबाखू आणि मद्यसेवन टाळलं पाहिजे. औषधं वेळेवर खाल्ली पाहिजे. फिजिकल अ‍ॅक्टिविटी नियमित केली पाहिजे. या गोष्टींना ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं.

Web Title: High blood pressure becomes the cause of heart attack and stroke you should be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.