हल्ली डाएटिंगचा ट्रेण्ड प्रचंड वाढलेला आहे. फिटनेस जपण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलंच आहे. पण काही लोक मात्र त्याचा अतिरेक करताना दिसत आहेत. खूप हेवी डाएट करणं किंवा जीममध्ये जाऊन एकदमच हेवी वर्कआऊट करणं असे प्रकार वाढले आहेत. तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे सगळं असेल तर हरकत नाही. पण काही लोक मात्र मनानेच किंवा दुसऱ्यांचं ऐकून मनात येईल त्याप्रमाणे व्यायाम, डाएट करतात (Hidden Causes of Kidney Damage at Young Age). असं सगळं करणं तुमच्या किडनीवर खूप वाईट परिणाम करणारं असू शकतं. म्हणूनच पाहा की व्यायाम, डाएट करताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्या...(how do heavy diet affects on kidney damage?)
कमी वयातच किडन्या खराब होण्याची कारणं
१. डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अशा कोणत्याही कारणासाठी हल्ली मनानेच पेनकिलर घेण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. कोणताही त्रास अंगावर काढण्याची इच्छाच तरुणाईला नसते. त्यामुळे मग वारंवार पेनकिलर घेतल्या जातात आणि त्याचा परिणाम किडन्यांवर होतो.
बाळंतपणानंतर ओटीपोट खूप सुटलं? आजीबाईंनी सांगितले जुने पारंपरिक उपाय- काही महिन्यांतच पोट सपाट
२. हल्ली प्रत्येकाच्या मागचा ताण खूप वाढला आहे. त्यामुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. बीपी जास्त असण्याचा आणि किडनीचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा.. कारण बीपी जास्त असेल त्याचा वाईट परिणाम किडन्यांच्या बारीक नसांवर होतो आणि किडन्या खराब होत जातात.
३. फिटनेसच्या नादात हल्ली एनर्जी ड्रिंक किंवा वेगवेगळ्या सप्लिमेंट्स घेण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. त्याचाही परिणाम किडन्यांवर होत जातो. आरोग्यासाठी त्यांचे अतिसेवन अजिबातच चांगले नाही.
ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून
४. हल्ली प्रोटीन शेक किंवा हाय प्रोटीन डाएट घेण्यावर डाएट प्रेमींचा भर असतो. हे करत असताना जर तुम्ही पाणी कमी प्रमाणात पित असाल तर त्याचा मात्र तुमच्या किडन्यांवर विपरित परिणाम होत जातो.
