शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच जिभेची काळजी घेणेही अत्यंत आवश्यक असते. अनेकदा जिभेवर पांढरा थर साचतो. बोलताना हा पांढरा थर दिसून येतो, ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व दुसऱ्यांसमोर खराब दिसते. जिभेवर अशाप्रकारे पांढरा थर साचून रहाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. आपण बऱ्याचवेळा दातांची काळजी घेत असतो. मात्र, संपूर्ण तोंडाची आणि जिभेची योग्य काळजी घेत नाही. अनेक लोकं महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करून तोंडाची सफाई करतात. मात्र, तसे न करता आपण घरगुती उपायांच्या मदतीने जीभ स्वच्छ करु शकतो.
जिभेवरील साचलेला पांढरा थर काढण्यासाठी घरगुती उपाय...
१. टंग क्लिनरचा वापर करा :- जिभेवरची घाण किंवा साचलेला पांढरा थर साफ करण्यासाठी ब्रश करताना टंग क्लिनरचा वापर करावा. विशेषतः आपण जीभ स्वच्छ करण्यासाठी स्टील किंवा तांब्याच्या धातूने बनलेला टंग क्लिनर वापरणे योग्य ठरेल. टंग क्लिनरने जीभ स्वच्छ केल्यामुळे जिभेवरील बॅक्टेरिया नष्ट करण्यात आणि तोंडात लाळेची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात मदत होते.
पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...
२. त्रिफळा पाण्याचा वापर करावा :- जीभ आणि तोंड स्वच्छ करण्यासाठी त्रिफळा चूर्ण वापरावे. त्रिफळाच्या गरम पाण्यामध्ये जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे तोंड निरोगी ठेवण्यास आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यात मदत करतात. जिभेच्या अधिक चांगल्या स्वच्छतेसाठी त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात मिसळून घ्यावे. यामुळे जिभेवरील पांढरा थर स्वच्छ करण्यास मदत मिळते.
३. गरम पाणी प्या :- जीभ आणि तोंडाचे सर्व भाग स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी दिवसभर कोमट पाणी प्यावे. हे आतडे निरोगी ठेवण्यास आणि घाण बाहेर टाकण्यास मदत करू शकते. जिभेच्या स्वच्छतेसाठी दिवसातून दर काही तासांनी गरम पाणी घोट - घोट पित राहणे फायदेशीर ठरेल.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...
दूध पिण्यापूर्वी किंवा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट ?
४. जास्त गोड खाऊ नका :- जीभ, दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाणे टाळावे. तोंडात बॅक्टेरिया राहिल्यामुळे हे गोड पदार्थ पचायला अवघड असतात.
५. बडीशेप खा :- जेवणानंतर नेहमी एक चमचा बडीशेप खावी. कारण बडीशेपमध्ये सुगंधी तेल असते जे श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका करुन देण्यास मदत करते. बडीशेप खाताना त्याचा निघणारा रस दात आणि जीभ स्वच्छ करण्याचेही काम करतो.