सध्या अनेकांना अपचन, गॅसेसच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळा सुरु झाल्यामुळे हा त्रास आपल्याला अधिक प्रमाणात होतो.(Stomach pain relief home remedies) मसाल्याचे, तेलाचे पदार्थ खाल्ल्याने पोट फुगल्यासारखे किंवा गच्च झाल्यासारखे वाटते. आपल्यापैकी अनेकांना वारंवार चहा-कॉफी किंवा बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय असते. (How to reduce bloating naturally) ज्यामध्ये तेलकट, फॅट असलेले पदार्थांचा समावेश जास्त असतो. या प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ल्याने गॅसेस आणि पोट फुगण्याच्या समस्या होतात. (Acidity treatment at home)
जर हा त्रास आपल्याला वारंवार होत असेल तर बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळायला हवे. (Home remedies for indigestion) ज्यामुळे आपल्याला पोटाच्या संबंधित समस्या जास्त प्रमाणात उद्भवणार नाही. तसेच पचनसंस्था देखील आपली सुरळीत राहिल. तसेच आपल्याला इतर त्रास देखील होणार नाही. (Natural remedies for acidity) कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवे आणि कोणते उपाय करायला हवे जाणून घेऊया.
कॉटन बडने कान साफ करताय? ' या ' चुका टाळा, कानाला होईल इजा, बहिरे व्हाल - तज्ज्ञांचा सल्ला
1. कोमट पाणी
आपल्याला जर पोट फुगल्यामुळे अस्वस्थ वाटत असेल तर लिंबाचा रस आणि थोडे मीठ मिसळून कोमट पाणी पिऊ शकता. हे पाणी प्यायल्याने आपल्याला बरे वाटेल. तसेच लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. लिंबात असणारे घटक अपचनाची समस्या दूर करते.
2. ओव्याचे पाणी
स्वयंपाकघरात आढळणारा ओवा हा अनेक आजारांवर बहुगुणी ठरतो. जर आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल तर ओवा खायला हवा. यामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होईल. त्यासाठी ओव्याला तव्यावर भाजून त्याचा पावडर तयार करा. ही पावडर पाण्यात मिसळून घेतल्याने आराम मिळेल.
औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब
3. शतपावली करा
जास्त खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी श्वास घेण्यास देखील त्रास होतो. जेव्हा पोट जड वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जा, शतपावली करा. यामुळे आपल्याला बरे वाटेल.
4. बाहेरचे खाणे टाळा
वारंवार बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्याला हानी होते. तसेच पचनसंस्था देखील बिघडते. रोज बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी आपण कधीतरी बाहेरचे पदार्थ खाणे ठीक असते. घरच्या अन्नपदार्थाला आपण जास्त प्रमाणात महत्त्व द्यायला हवे.