Heart Attack : सामान्यपणे कुणीही आजारी पडल्यावर किंवा शरीरात काही गडबड झाली असल्यास डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर व्यवस्थित चेकअप केल्यावर योग्य तो सल्ला देतात. पण जर डॉक्टरांनीच स्वत: या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांना हार्ट अॅटॅक आला तर...? असंच एका डॉक्टरांसोबत झालंय. कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर विलियम विल्सन यांना हार्ट अॅटॅक आला. यावेळी त्यांनी एक अशी चूक केली ज्यावर त्यांचा स्वत:चा विश्वास बसत नाहीये.
'डेली मेल'च्यारिपोर्टनुसार, डॉक्टर विल्सन यांनी तब्येत ठणठणीत होती. ते नियमितपणे व्यायाम करत होते. सकाळी ते त्यांच्या पत्नीसोबत व्यायाम करत होते. तेव्हाच त्यांना जरा वेगळं काहीतरी जाणवलं. त्यांना केवळ थोडं अस्वस्थ वाटलं. पण तेवढंच मात्र तो हार्ट ॲटॅक आहे हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. ते म्हणतात की, मला ना वेदना झाल्या ना काही पॅनिक ॲटॅक होता. थोडा ताण जाणवला. अस्वस्थ वाटलं. पण नंतर लक्षात आलं की मला अचान बैचेन झालं, लघवीला जावं, संडासला लागली असं वाटत होतं. आपला कंट्रो नाहीये त्यावर असंही वाटलं. पण मी त्याकडे दुर्लक्षच केलं. मिनिटभर मलाच कळलं नाही की काय झालं. पण तो हार्ट ॲटॅकच होता. नशिबाने मी वाचलो. त्यामुळे असं काही वाटलं अचानक तर दुर्लक्ष करु नका. तातडीने डॉक्टरकडे जा, ॲम्ब्युलन्स बोलवा. लवकरात लवकर उपचार मिळाले तरच वाचण्याची शक्यता असते.