Join us

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्यावे असे पौष्टिक ज्यूस, करायला सोपे आणि तब्येतीसाठी अतिशय लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:07 IST

High cholesterol : आपल्या खाण्या-पिण्यातून आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. त्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. 

High cholesterol : हाय कोलेस्टेरॉलची समस्या आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीमध्ये आढळून येते. तसं कोलेस्टेरॉल शरीरातील वेगवेगळ्या कामांसाठी गरजेचं असतं. जे लिव्हर तयार करतं. पण जर कोलेस्टेरॉल वाढलं तर मात्र गंभीर समस्या होतात. आपलं लिव्हर आवश्यक तेवढं कोलेस्टेरॉल तयार करतं. पण आपल्या खाण्या-पिण्यातून आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. त्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. 

कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात, एक गुड कोलेस्टेरॉल ज्याला HDL असंही म्हणतात आणि दुसरं बॅड कोलेस्टेरॉल ज्याला LDL असं म्हणतात. जेव्हा शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढतं, तेव्हा हृदयरोग, हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जर वेळीच यावर उपचार केले नाही तर जीवाला धोका होतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्याचा एक उपाय पाहुया.

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणं

अनहेल्दी फूड, व्यायाम न करणं, लठ्ठपणा, धुम्रपान, मद्यसेवन आणि काही आजारांमुळे शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. अशात हाय कोलेस्टेरॉलपासून बचाव करण्यासाठी हेल्दी फूड, नियमित व्यायाम आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय प्यावं?

न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी एक उपाय शेअर केला आहे. यासाठी रोज डाएटमध्ये एका ज्यूसचा समावेश करावा लागेल आणि हा ज्यूस दुधी भोपळा, काकडी, कोथिंबीर, पुदिन्यापासून बनवता येईल.

ज्यूससाठी साहित्य

अर्धा दुधी भोपळा

एक काकडी

थोडा कोथिंबीर

काही पुदिन्याची पानं

अर्ध्या लिंबाचा रस

अर्धा ग्लास पाणी

कसा बनवाल?

हाय कोलेस्टेरॉल कमी करणारा हा ज्यूस बनवणं फारच सोपं आहे. यासाठी सगळ्या गोष्टी मिक्सरमधून बारीक करा. त्यानंतर गाळून यातील रस काढा. आपला ज्यूस तयार आहे. 

पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करणं जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे की, आपण त्या गोष्टी कधी खातो किंवा पितो. आपल्याला कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर हा ज्यूस आपण सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता.  

टॅग्स : हेल्थ टिप्सहृदयरोगहृदयविकाराचा झटका