आपल्या शरीरातील कोणताही बदल हा अनेकदा आत सुरू असलेल्या आरोग्यविषयक समस्यांचा संकेत असतो. अनेकदा आपण पाहतो की लघवी करताना जास्त फेस येतो, जो काही वेळाने आपोआप विरघळतो. कधीकधी लघवीचा वेग जास्त असल्यानेही फेस येतो, पण जर तुम्हाला वारंवार किंवा सातत्याने फेसयुक्त लघवीची समस्या जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. लघवीमध्ये फेस येण्याचा नेमका अर्थ काय असू शकतो हे केवळ डिहायड्रेशनचे लक्षण आहे की किडनी, यकृत किंवा शरीरातील प्रोटीन लीकेजसारख्या कोणत्या गंभीर समस्येकडे संकेत देत आहे हे वेळीच ओळखणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते(Health tips know the common causes of foamy urine treatment).
प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्या मते, या समस्येवर आपल्या रोजच्या लाईफस्टाईल आणि आहारात काही साधे आणि नैसर्गिक बदल करून नियंत्रण मिळवता येते. लघवीत फेस येण्याची समस्या कमी करण्यासाठी तुमचा आहार आणि लाईफस्टाईल कसे असावे जेणेकरून किडनीचे आरोग्य सुरळीत चालेल याबद्दल सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शहा यांच्याकडून (foamy urine causes & treatment) अधिक माहिती घेऊयात.
श्वेता शहा सांगतात, काहीवेळा लघवीला फेस येणे फारच कॉमन असू शकते. जसे की, अनेकदा लघवीचा वेग जास्त असल्यामुळे लघवीत फेस येतो. पण जर ही समस्या वारंवार होत असेल किंवा सतत टिकून राहत असेल, तर यामागे काही इतर कारणे देखील जबाबदार असू शकतात. जसे की-
१. प्रोटीन लीकेज (Protein Leak) न्यूट्रिशनिस्टच्या मते, जेव्हा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा लघवीतून प्रोटीन बाहेर पडू लागते, ज्यामुळे फेस तयार होतो.
२. डिहायड्रेशन (Dehydration) पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी अधिक घट्ट होते आणि जास्त काळ लघवीला फेस आलेला दिसतो.
३. यूटीआय (UTI) किंवा इतर संसर्गामुळे देखील लघवीमध्ये फेस तयार होऊ लागतो.
असे झाल्यावर काय करावे? या प्रश्नाचे उत्तर देताना न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर तुम्हालाही लघवीमध्ये फेस दिसत असेल, तर काही नैसर्गिक उपाय करून किडनीला मजबूत करु शकता आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जाऊ शकतात.
रोज न विसरता खा ६ गोष्टी, नसांमध्ये ब्लोकेज होणे टाळणे ते हातापायांना मुंग्या सगळ्यांवर सोपा उपाय...
१. ऑईल पुलिंग (Oil Pulling) :- सर्वात आधी न्यूट्रिशनिस्ट ऑईल पुलिंग म्हणजेच तेलाने गुळण्या करण्याचा सल्ला देतात. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तिळाचे तेल तोंडात घेऊन ५ ते १० मिनिटे तोंडात ठेवून गुळण्या करून थुंकून टाका. असे केल्याने तोंडाच्या स्वच्छतेसोबतच शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
२. पाणी पिऊन हायड्रेटेड रहा :- दिवसभर ८ ते १० ग्लास पाणी प्या. याव्यतिरिक्त, न्यूट्रिशनिस्ट सुचवतात की सकाळी एक ग्लास पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ किंवा लिंबाचे काही थेंब मिसळून प्यावे. हे शरीराचा PH संतुलित ठेवते आणि किडनीचे कार्य सुधारण्यास मदत करतात.
३. धण्याचे पाणी :- किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि खासकरून यूटीआय (UTI) सारख्या संसर्गापासून मुक्ती मिळवण्यासाठी धण्याचे पाणी खूप फायदेशीर मानले जाते. यासाठी १ चमचा अख्खे धणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी गाळून हे पाणी प्या.
४. नारळ पाणी :- आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्टच्या मते, नारळ पाणी नैसर्गिकरित्या मूत्रवर्धक (लघवीचे प्रमाण वाढवणारे आहे) असे आहे. यामुळे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहतात आणि किडनीला पोषण मिळते. अशा परिस्थितीत तुम्ही नारळ पाण्याचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता.
तासंतास मान खाली घालून फोन पाहताय? डिप्रेशन- एन्झायटीचा धोका, स्क्रोल करता करता जाल हरवून....
५. जवाचे पाणी :- जवाचे पाणी किडनीचे कार्य आणि लघवीशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. यासाठी १ चमचा जव २ कप पाण्यात उकळा. उकळल्यानंतर दिवसातून १ ते २ वेळा प्या. यामुळे किडनी स्वच्छ राहते आणि युरीन सिस्टम शांत होते.
६. त्रिफळा चूर्ण :- रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्यावे. आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, असे केल्याने पचन चांगले होते आणि शरीरातील विषारी घटक सहजपणे बाहेर पडतात.
७. प्राणायाम :- सकाळी किमान ३ मिनिटे प्राणायाम सारखे श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करावेत. असे केल्याने शरीरात पित्त कमी होते आणि एकूण आरोग्य सुधारते.
श्वेता शहा सांगतात की, लघवीत फेस येणे याकडे दुर्लक्ष करू नये. हे किडनीच्या खराब कार्यक्षमतेचे संकेत असू शकते. जर तुम्ही वरील उपाय केल्यानंतरही तुम्हाला सतत असे लक्षण दिसत असेल, तर याबद्दल एकदा डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
