शरीराला गरजेची असणारी अनेक गुणधर्म असतात. जी विविध पदार्थातून मिळवता येतात. अनेक प्रकारची जीवनसत्वे गरजेची असतात. त्यापैकीच एक म्हणजे 'ई' .जीवनसत्त्व 'ई' हा एक महत्त्वाचा घटक आहे. (health tips, If vitamin E is low, many serious diseases can occur, eat 10 foods regularly)जे आपल्या शरीरातील पेशींचे संरक्षण करते. त्वचा, डोळे, रोगप्रतिकारक शक्ती यांच्यासाठी खूप आवश्यक असते. जीवनसत्त्व ई कमी झाल्यास शरीरात विविध शारीरिक त्रास जाणवायला सुरुवात होते. जे दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यास गंभीर स्वरुपाचे ठरु शकतात.
शरीरात जीवनसत्त्व 'ई'ची कमतरता असेल तर आधी त्वचेमध्ये बदल जाणवू लागतात. त्वचा कोरडी पडते. पांढरी दिसायला लागते. काही वेळा त्वचा काळवंडायला लागते. सुरकुत्या पडू लागतात. डोळ्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. दृष्टीवर वाईट परिणाम होतात. कमी दिसायला लागते. रातांधळेपण येऊ शकतो.
याव्यतिरिक्त शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते. सतत सर्दी-खोकला होणे, लवकर संक्रमण होणे यासारख्या तक्रारी वाढायला लागतात. स्नायूं कमकुवत होतात. चालताना तोल जाणे किंवा थकवा जाणवणे ही देखील जीवनसत्व ईच्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. वृद्ध व्यक्तींमध्ये ही कमतरता असल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊन समतोल साधण्यात अडचणी येऊ शकतात. काही संशोधनांनुसार मेंदूच्या पेशींवर याचा प्रतिकूल परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते.
शरीरात जीवनसत्त्व 'ई'ची पातळी योग्य ठेवण्यासाठी आहारातून ते नियमित मिळणे आवश्यक असते. विविध बिया आणि सुकामेवा हे जीवनसत्व 'ई'चे उत्तम स्रोत आहेत. बदाम, अळशी बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि चिया सिड्स यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ई असते. याशिवाय गव्हातही भरपूर प्रमाणात हे जीवनसत्त्व असते. हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, कारले, यांमध्येही जीवनसत्व ई आढळते.
आजकाल फार लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे आवाकाडो. हा पदार्थ शरीरासाठी फार फायद्याचा असतो. त्यात अनेक गुणधर्म असतात. त्यामध्ये जीवनसत्व 'ई'चा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात ई असते. त्यामुळे नक्की खा. शरीरातील जीवनसत्त्व 'ई' कमी झाल्यावर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच उपाय केलेले चांगले.