Join us

फक्त दारुमुळेच नाही 'या' कारणांमुळेही बिघडतं लिव्हरचं काम! तारुण्यातच लिव्हर कॅन्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 15:33 IST

5 Mistakes That Affects Liver Most: दारू प्यायल्यामुळेच लिव्हरचं आरोग्य बिघडतं असं नाही. तर बहुतांश लोकांकडून ज्या चुका अगदी सहज होऊन जातात त्यामुळेही फॅटी लिव्हरचा त्रास वाढतो.(health tips for healthy liver)

ठळक मुद्दे अमेरिकन लिव्हर फाउंडेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार लिव्हरच्या आजारांच्या  बाबतीत २५ ते ३० टक्के केसेस अशा आहेत, जे लोक अजिबता दारू पित नाहीत.

आपल्याला माहितीच आहे की लिव्हर किंवा यकृत हा शरीरातला एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आपण जे काही अन्न खातो ते अन्न पचविण्यासाठी लागणारे पित्त किंवा पाचक रस यकृतामध्ये तयार होतात. त्यामुळे अन्नपचनाचे कार्य सोपे होते. याशिवाय शरीर डिटॉक्स करण्याची मुख्य जबाबदारीही लिव्हरची असते. म्हणजेच शरीरात असणारे विषारी घटक, शरीरासाठी हानिकारक असणारे घटक शरीराबाहेर फेकण्याचे काम लिव्हरद्वारे होते. रक्त शुद्धीकरणाचे कामही लिव्हर करते. याशिवाय लिव्हरमध्ये काही हार्मोन्सही तयार होत असतात. पण सध्या असे दिसत आहे की शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या लिव्हरचे आरोग्यच बिघडत चालले आहे. त्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास वाढत चालला आहे (how to keep liver healthy?). या त्रासासाठी फक्त दारूचे सेवन हेच एक कारण नाही.(5 lifestyle mistakes that damage liver function)

 

फॅटी लिव्हरचा त्रास वाढण्याची मुख्य कारणं 

रोजच्या रोज आपण ज्या काही चुका अगदी सहज करतो त्या चुकांमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडत चालले असून लिव्हर कॅन्सरचा धोकाही वाढतो आहे.

स्वयंपाक घरातच आहे प्रोटीन्सचे भांडार! 'हे' स्वस्तात मस्त पदार्थ रोज खा- भरपूर प्रोटीन्स मिळतील

अमेरिकन लिव्हर फाउंडेशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार लिव्हरच्या आजारांच्या  बाबतीत २५ ते ३० टक्के केसेस अशा आहेत, जे लोक अजिबता दारू पित नाहीत. पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्यांना लिव्हरचे दुखणे आहे. त्या रिपोर्टनुसार कोल्ड्रिंक, पॅकबंद गोड पेय जास्त प्रमाणात प्यायल्याने त्याचा लिव्हरवर परिणाम होतो. कारण त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात असणारी साखर आणि इतर केमिकल्स फॅटी लिव्हरच्या त्रासासाठी कारणीभूत ठरतात.

 

याशिवाय तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही फॅटी लिव्हरचा त्रास वाढतो. कारण त्या पदार्थांमुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात फॅट्स जातात आणि लिव्हरमध्ये त्यांचा थर जमायला सुरुवात होते. यामुळे लिव्हरचे कार्य बिघडून त्याचा तब्येतीवर परिणाम होतो.

रोजच्या वापरातलं कुकर तळाशी नेहमीच काळं पडतं? ३ उपाय- काळपट कुकर चटकन होईल स्वच्छ

त्यामुळे रक्तातील काेलेस्टेरॉल वाढण्याचीही भीती असते. म्हणूनच जास्त फॅट्स असणारे डबाबंद पदार्थ, प्रोसेस्ड फूड खाणे टाळायला हवे. लिव्हरच्या आरोग्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणे, शरीर हायड्रेटेड ठेवणे, हिरव्या पालेभाज्या खाणे आणि वर्षातून एकदा लिव्हर फंक्शन टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलअन्न