Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लहान वयातच लागलेला चष्मा घालवण्यासाठी या सवयी ठरतील फायद्याच्या - नंबर वाढणार नाही

लहान वयातच लागलेला चष्मा घालवण्यासाठी या सवयी ठरतील फायद्याच्या - नंबर वाढणार नाही

Health tips, do you use glasses? see how to make eyesight strong , try these remedies : लहान वयात लागलेला चष्मा घालवण्यासाठी करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2025 16:46 IST2025-09-08T16:43:21+5:302025-09-08T16:46:58+5:30

Health tips, do you use glasses? see how to make eyesight strong , try these remedies : लहान वयात लागलेला चष्मा घालवण्यासाठी करा हे उपाय.

Health tips, do you use glasses? see how to make eyesight strong , try these remedies | लहान वयातच लागलेला चष्मा घालवण्यासाठी या सवयी ठरतील फायद्याच्या - नंबर वाढणार नाही

लहान वयातच लागलेला चष्मा घालवण्यासाठी या सवयी ठरतील फायद्याच्या - नंबर वाढणार नाही

लहान वयात मुलांना किंवा तरुणांना चष्मा लागला की लगेच तो घालवण्यासाठी उपाय औषधे सुरु होतात. प्रत्यक्षात डोळ्यांचा नंबर हा आनुवंशिकता, जीवनशैली आणि वाढत्या वयातील बदल यावर अवलंबून असतो. (Health tips, do you use glasses?  see how to make eyesight strong , try these remedies  )त्यामुळे जादूई उपाय करुन नंबर पूर्णपणे नाहीसा होत नाही. मात्र योग्य उपचार घेऊन अगदी भिंगाचा चष्माही लोकांनी घालवल्याची उदाहरणे आहेत. काही सवयी अंगीकारल्यास डोळ्यांवरचा ताण कमी होतो, नंबर वाढण्याचा वेग कमी करता येतो आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. लहान मुलांचा चष्मा पटकन घालवता येऊ शकतो. 

जीवनशैलीबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल लहान मुलं बराच वेळ मोबाइल, टीव्ही किंवा कॉम्प्युटरसमोर बसतात. यामुळे डोळ्यांवर सतत ताण येतो. लहान मुलांना या उपकरणांपासून दूर ठेवा. ती सवय चांगली नाही. काम करणाऱ्या तरुणांनीही दर तासाभराने डोळ्यांना थोडी विश्रांती देणे, निसर्गाकडे पाहणे किंवा किमान काही वेळ लांब अंतरावर पाहण्याची सवय लावणे हे फार महत्त्वाचे ठरते. डोळ्यांना उघडझाप करणे, पाण्याने स्वच्छ धुणे आणि झोप पूर्ण घेणेही तितकेच गरजेचे आहे.

घरगुती आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त मानला जातो. गाजर, बीट, पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या हिरव्या भाज्या डोळ्यांना आवश्यक असलेले जीवनसत्त्व ए देते. डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी सुकामेवा जसे की बदाम, अक्रोड, मनुका तसेच जवसाचे बी, सूर्यफूलाचे बी यांचा उपयोग होतो. दुधात प्रोटीनसह डोळ्यांसाठी उपयोगी असलेले पोषक घटक असतात. संत्री, मोसंबी, लिंबू यांसारख्या फळांमधील जीवनसत्त्व सी डोळ्यांचे रक्ताभिसरण सुधारते. पपई, आंबा, टोमॅटो यांसारखी फळेही डोळ्यांना लाभदायी असतात.

डोळ्यांची कसरत करणे हेही महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर डोळ्यांवर तळहात हलकेच ठेवून काही सेकंद  अंधार करणे, डोळे गोल गोल फिरवणे, वर-खाली आणि बाजूला पाहण्याचे छोटे व्यायाम करणे यामुळे डोळ्यांचे स्नायू लवचिक राहतात. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांचा नंबर लहान असल्यास तो वाढू नये म्हणून नेत्रतज्ज्ञांचा नियमित सल्ला घ्यावा. चुकीचा चष्मा लावल्यास डोळ्यांवर अधिक ताण येतो. काही वेळा नंबर वयानुसार आपोआप कमी होतो किंवा स्थिर राहतो. त्यामुळे अति अपेक्षा ठेवण्याऐवजी योग्य सवयी, योग्य आहार आणि वेळोवेळी तपासणी यावर भर दिला तर डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येते.

Web Title: Health tips, do you use glasses? see how to make eyesight strong , try these remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.