Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोण म्हणतं भात कमी खायचा? तांदूळ शिजवण्याआधी १ युक्ती वापरा, ना पोट सुटणार ना शुगर वाढणार

कोण म्हणतं भात कमी खायचा? तांदूळ शिजवण्याआधी १ युक्ती वापरा, ना पोट सुटणार ना शुगर वाढणार

How To Eat Rice in Right Way : तांदूळ पाण्यात भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे तुम्हाला झोपेचे त्रासही उद्भवत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 11:39 AM2024-05-24T11:39:01+5:302024-05-24T11:55:10+5:30

How To Eat Rice in Right Way : तांदूळ पाण्यात भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे तुम्हाला झोपेचे त्रासही उद्भवत नाहीत

Health Should You Soak Rice Before Cooking Does Is Control Sugar Level Know From Dietiacian | कोण म्हणतं भात कमी खायचा? तांदूळ शिजवण्याआधी १ युक्ती वापरा, ना पोट सुटणार ना शुगर वाढणार

कोण म्हणतं भात कमी खायचा? तांदूळ शिजवण्याआधी १ युक्ती वापरा, ना पोट सुटणार ना शुगर वाढणार

भारतीय घरांतील स्वयंपाकात भात हा महत्वाचा घटक आहे. वरण, डाळ, भाजी, भात हे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. ज्यामुळे भूक कमी लागते. (Cooking Hacks) दुपारी भात खाल्ल्यानंतर झोप येऊ लागते. लोकांना वजन वाढण्याची समस्याही उद्भवते. यामागे अनेक कारणं असू शकतात. भात शिजवण्याची योग्य पद्धत माहीत असेल तर तुम्हाला इतर त्रास सहज करावे लागणार नाहीत. (How To Eat Rice in Right Way)

तांदूळ पाण्यात भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे तुम्हाला झोपेचे त्रासही उद्भवत नाहीत. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते. तांदूळाच्या पाण्यामुळे यातील पोषक तत्व शोषले जातात. याव्यतिरिक्त ग्लायसेमिक इंडेक्सवरही परिणाम होतो.  जेवणात कार्बोहायड्रेट्स जितके जास्त तितकी ब्लड शुगर लेव्हल वाढते. (Health Should You Soak Rice Before Cooking Does Is Control Sugar)

प्रामुख्याने लोक पांढरा पॉलिश केलेला तांदूळ खाण्याला प्राधान्य देतात. पण तांदूळ अधिक चवदार बनवण्यासाठी धान्याचा भूसा आणि बाहेरचा थर सोलून टाकला जातो. भारताच्या पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील भागात पांढरा भात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. (Ref) तांदूळ चांगल्या गुणवत्तेचा असणं फार महत्वाचे असते. भात भरपूर डाळी आणि भाज्यांसोबत बनवल्यास त्याचे पोषण मुल्य अधिकच वाढते. 

पांढऱ्या भातसारखे जास्त कार्ब्स खाल्ल्याने  रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि इन्सुलिनची पातळी वाढते. डायबिटीस केअरने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असूं दिसून आलं की पांढऱ्या तांदूळाच्या जास्त  सेवनाने रक्तातील साखरेचा धोका वाढतो. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं की कार्बोहायड्रेट्सचे जास्त सेवन डायबिटीसच्या रुग्णांसााठी अधिक फायदेशीर ठरते. ज्यामुळे टाईप २ डायबिटीस संवेदनशीलता कमी होण्यास मदत होते. 

तांदूळ भिजवण्याचे काय फायदे आहेत

तांदूळ भिजवल्याने एंजाइमॅटीक ब्रेकडाऊन होते. असं केल्याने यातील कार्बोहायड्रेट्स तुटून सिंपलर शुगरमध्ये कन्वर्ट होतात. ज्यामुळे  शरीर पोषक तत्व शोषून घेते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

भात बनवताना या गोष्टींची काळजी घ्या (How To Make Rice in Right Way)

भात पाण्यात भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. डायबिटीसच्या रुग्णांसाठी हा  एक उत्तम पर्याय आहे.  ३ ते ४ तास पाण्यात ठेवा. त्यात  व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. ज्यामुळे तांदूळातील पोषक तत्व नष्ट होऊ शकतात. जर तुम्हाला तांदूळ पाण्यात भिजवायचे नसतील तर पाण्याने धुवूनही शिजवू शकता. ज्यामुळे तांदूळाचे टेक्सचर चांगले राहते.

Web Title: Health Should You Soak Rice Before Cooking Does Is Control Sugar Level Know From Dietiacian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.