Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नखं वाढवायची आवड पोटासाठी ठरेल त्रासदायक , बिनधास्त वाढवा नखं फक्त लक्षात ठेवा हे नियम

नखं वाढवायची आवड पोटासाठी ठरेल त्रासदायक , बिनधास्त वाढवा नखं फक्त लक्षात ठेवा हे नियम

Health risks of long nails, see How to clean long nails - health care tips : लांब नखं ठेवताना काळजी घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 19:11 IST2026-02-24T19:10:06+5:302026-02-24T19:11:16+5:30

Health risks of long nails, see How to clean long nails - health care tips : लांब नखं ठेवताना काळजी घ्या.

Health risks of long nails, see How to clean long nails - health care tips | नखं वाढवायची आवड पोटासाठी ठरेल त्रासदायक , बिनधास्त वाढवा नखं फक्त लक्षात ठेवा हे नियम

नखं वाढवायची आवड पोटासाठी ठरेल त्रासदायक , बिनधास्त वाढवा नखं फक्त लक्षात ठेवा हे नियम

अनेकांना लांब आणि सुंदर नखं वाढवण्याची खूप आवड असते. नीट शेप दिलेली, स्वच्छ आणि मजबूत नखं हातांचं सौंदर्य वाढवतात. त्याला छान नेलपेंट लावायचे. त्यावर डिझाइन करायचे आणि इतरही काही गोष्टी असतात ज्यामुळे नखं फारच सुंदर दिसतात. पण नखं वाढवणं जितकं आकर्षक वाटतं, तितकीच त्यांची योग्य काळजी घेणंही गरजेचं असतं. कारण नखं मोठी असली की त्यात सहज माती, धूळ आणि जंतू अडकू शकतात आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

नखं लांब असली की रोजच्या कामात विशेषतः स्वयंपाक, भाजी चिरणे, कणिक मळणे, भांडी घासणे किंवा बाहेर फिरताना कुठेही हात लागला की नखांत माती साचते. ती वेळेवर स्वच्छ केली नाही तर जंतू वाढू शकतात. हे जंतू अन्नातून पोटात गेल्यास पोटदुखी, जुलाब किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. लहान मुलांची काळजी घेताना देखील मोठ्या नखांमुळे त्यांच्या त्वचेवर ओरखडे उठू शकतात. त्यामुळे नखं वाढवत असाल तर स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. (Health risks of long nails, see How to clean long nails - health care tips )नखं मजबूत हवी असतील तर शरीरात प्रथिने, कॅल्शियम, बायोटिन आणि लोह यांचे प्रमाण जास्त हवे. कमतरता असल्यास नखं तुटतात, पातळ होतात किंवा लगेच खराब होतात. दूध, डाळी, सुका मेवा आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश केल्यास नखांना पोषण मिळतं. पुरेसं पाणी पिणंही आवश्यक आहे, कारण त्यामुळे नखं कोरडी आणि नाजूक होत नाहीत.

नखं वाढवत असताना आठवड्यातून किमान एकदा ती स्वच्छ ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ करावीत. नखांच्या खाली साचलेली माती नीट काढावी. मात्र टोकदार वस्तू वापरून खूप खोदू नये, त्यामुळे त्वचेला जखम होऊ शकते. भांडी घासताना किंवा केमिकल क्लिनर वापरताना हातमोजे वापरणं उत्तम. कारण केमिकल्समुळे नखं कमकुवत होतात. नखांना नियमित तेल लावणंही फायदेशीर ठरतं. बदाम तेल किंवा नारळ तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास नखं मजबूत राहतात आणि तुटण्याची शक्यता कमी होते. नेलपॉलिश लावत असाल तर सतत केमिकल रिमूव्हर वापरणं टाळावं. मध्ये मध्ये नखांना आराम देणंही गरजेचं असतं. कोमट पाण्यात नखं भिजवायची. त्यातील घाण निघून जाते. नखांतील माती पोटात गेली तर जंत होतात. 

थोडक्यात सांगायचं तर, नखं वाढवणं चुकीचं नाही, पण त्यासाठी योग्य स्वच्छता, पोषण आणि काळजी घेणं अत्यावश्यक आहे. नखं सुंदर दिसण्याइतकीच ती निरोगी असणंही महत्त्वाचं आहे. थोडी काळजी घेतली तर तुमची लांबसडक नखं केवळ आकर्षकच नाही तर सुरक्षितही राहतील.

Web Title : नाखूनों को सुरक्षित रूप से बढ़ाएँ: स्वास्थ्य के लिए स्वच्छता, आहार जरूरी।

Web Summary : लंबे नाखूनों में कीटाणु हो सकते हैं, जिससे स्वास्थ्य संबंधी समस्याएं हो सकती हैं। नियमित रूप से नाखूनों को साफ करें, प्रोटीन, कैल्शियम और आयरन से भरपूर पौष्टिक आहार लें। सफाई करते समय दस्ताने पहनें, नाखूनों को मॉइस्चराइज़ करें और स्वस्थ, आकर्षक नाखूनों के लिए अत्यधिक नेल पॉलिश रिमूवर से बचें।

Web Title : Grow nails safely: Hygiene, diet are key for health.

Web Summary : Long nails can harbor germs, causing health issues. Clean nails regularly, maintain a nutritious diet rich in protein, calcium and iron. Use gloves while cleaning, moisturize nails, and avoid excessive nail polish remover for healthy, attractive nails.