चपाती आणि भात हा आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग आहे. बरेच लोक चपाती खाणं पसंत करतात तर काहींना भात खायला आवडतो. काही लोक चपातीकडे एक हेल्दी पर्याय म्हणून रोजच्या जेवणात चपाती खातात तर काहीजण भात पचायला हलका म्हणून खातात. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की भात पचायला कमी वेळ लागतो पण चपाती खाणंही तितकंच महत्वाचं असतं पण तुम्ही दोन्ही योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीराला जास्त फायदे मिळतील. (Health How Long Chapati And Rice Take To Digest Which Is Good For Your Stomach Dietitian Ranjana Singh Explains)
रोजच्या जेवणातला भात आणि चपाती पचायला किती वेळ लागतो?
आहारतज्ज्ञ रंजना सिंह यांनी सांगितले की भात पचायला जवळपास १ ते २ तासांचा वेळ लागतो. खासकरून पांढरा भात लगेच पचतो कारण यात फायबर्स कमी असतात. तांदूळ शरीरात जाऊन ग्लुकोजमध्ये बदलतो याच कारणामुळे आजारी किंवा कमकुवत लोकांना भात न खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे पोट हलकं राहतं आणि लवकर एनर्जी मिळते. ब्राऊन राईसच्या तुलनेत या भातात फायबर्स जास्त असतात आणि हा भात पचायला हलका असतो.
आहारतज्ज्ञ सांगतात की गव्हाची चपाती पचायला थोडा जास्तवेळ लागतो. यात फायबर्स, कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेस जास्त असतात जे पचायला ३ ते ४ तास लागतात यातून हळहळू एनर्जी मिळते आणि दिवसभर पोट भरलेलं राहतं. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात किंवा ज्यांना जास्त एनर्जी हवी असते त्याच्यासाठी ही चपाती उत्तम उपाय ठरू शकते. मल्टीग्रेन किंवा बजारीची भाकरी गव्हाच्या चपातीपेक्षा पचायला हलकी आणि पौष्टीक असते. चपाती कोणत्या धान्यापासून बनली आहे याचा परिणाम पचनावर होतो.
एक्सपर्ट्स सांगतात की हे फक्त अन्नावरच नाहीतर लाईफस्टाईलवरही अवलंबून असते. जर तुम्ही हळहूळू खात असाल आणि अन्न व्यवस्थित चावून खात असाल तर अन्नाचे पचन व्यवस्थित होते. जे लोक फिजिकली एक्टिव्ह असतात त्यांचे जेवण लगेच पचते. जे लोक सतत एकाच ठिकाणी बसून काम करतात त्याचं अन्न पचायला वेळ लागतो. अशा स्थितीत भात आणि चपाती यांचे संतुलित प्रमाणात सेवन करणं खूप महत्वाचं असतं. आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा.
Web Summary : Rice digests faster (1-2 hours) due to lower fiber, while chapati (3-4 hours) offers sustained energy. Choose based on activity level and dietary needs for optimal health. Balance is key.
Web Summary : चावल कम फाइबर के कारण जल्दी (1-2 घंटे) पचता है, जबकि रोटी (3-4 घंटे) धीरे-धीरे ऊर्जा देती है। अपनी गतिविधि और आहार के अनुसार चुनें। संतुलन महत्वपूर्ण है।