डोकेदुखी अगदी साधी आणि सतत उद्भवणारी समस्या आहे. सर्दी झाली असेल किंवा खोकला झाला असेल तर डोकं दुखते. तापात दुखते. (health care tips, Constant headache, eyes getting blurry? 5 habits of yours are giving you a headache)पित्ताने दुखते. कोणत्याही आजारामुळे डोके दुखू शकते. मात्र कधी काही त्रास होत नसताना उगाच डोके दुखते. डोके अगदी जड होते. बेचैन झाल्यासारखे वाटत राहते. कानठळ्या बसतात. कानाच्यामागे दुखायला लागते. अनेकांना असा त्रास होतो. त्याचे कारण कळत नाही आणि डॉक्टरांकडे जाण्याएवढा त्रास होत नसल्याने दुर्लक्ष केले जाते. पण असे डोके दुखायला लागल्यावर कशात मन लागत नाही. सारखे डोळे मोठे करुन पाहावे लागते आणि त्यामुळे आणखी ताण येतो. जाणून घ्या डोक्यात ठणके बसण्यामागे काय कारणे असू शकतात.
१. आजकाल अनेकांच्या कानात इअरफोन्स कायम घातलेले असतात. कामानिमित्त असेल किंवा इतर काही कारणामुळे असेल, सतत कानात आवाज सुरु असतो. त्यामुळे डोक्याला त्रास होऊ शकतो. कानाचा थेट संबंध डोक्याशी असल्याने डोक्याला सततचा आवाज सहन होत नाही. आरामाची गरज असते. त्यामुळे इअरफोन्स वापरण्याचे प्रमाण कमी करायला हवे.
२. झोप व्यवस्थित होत नसेल तरी डोके जड होते. शांत झोप फार गरजेची असते काही कारणास्तव जर तुमची झोप सारखी मोडत असेल तर सलग झोप न मिळणे हे ही एक कारण ठरते. योग्य झोप आरोग्यासाठी फार गरजेची असते.
३. तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता? कमी पाणी प्यायल्यामुळे डोके दुखते. डिहायड्रेशनमुळे बेचैन झाल्यासारखे वाटते. त्यामुळे रोज भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. पावसाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे पाणी पिण्याकडे लक्ष द्यायचे.
४. चहा कॉफी सारखे पदार्थ ठरल्यावेळी रोज प्यायची सवय बऱ्याच जणांना असते. एखाद्याला ४ वाजता चहा प्यायची सवय असेल तर ४च्या ठोक्याला त्याचा जीव चहासाठी वर खाली होतो. रोजच्या सवयीमध्ये जर अचानक बदल झाला तरी परिणामी डोके दुखू शकते.
५. डोळे थकले असतील तरी डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांना वेळोवेळी आराम द्यायचा. काम करताना, मोबाइल वापरताना तसेच इतरही काही करत असताना डोळे मधेच बंद करायचे. हातावर हात चोळून डोळ्यांवर ठेवायचे. डोळ्यांवर पाणी मारायचे.