Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवणानंतर विडा खाण्याची आजीआजोबांची पारंपरिक रीत कामाची, गॅस-अपचन-पित्ताचा त्रास टाळण्याचा हुकमी पत्ता...

जेवणानंतर विडा खाण्याची आजीआजोबांची पारंपरिक रीत कामाची, गॅस-अपचन-पित्ताचा त्रास टाळण्याचा हुकमी पत्ता...

health benefits of paan leaves : betel leaf for gas problem : paan leaf for stomach pain relief : नागवेलीचे पान चावून खा... गॅस होणे, पोट फुगणे, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 14:19 IST2026-01-20T13:58:16+5:302026-01-20T14:19:23+5:30

health benefits of paan leaves : betel leaf for gas problem : paan leaf for stomach pain relief : नागवेलीचे पान चावून खा... गॅस होणे, पोट फुगणे, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि भूक न लागणे यांसारख्या समस्या होतील दूर

health benefits of paan leaves betel leaf for gas problem, paan leaf for stomach pain relief, | जेवणानंतर विडा खाण्याची आजीआजोबांची पारंपरिक रीत कामाची, गॅस-अपचन-पित्ताचा त्रास टाळण्याचा हुकमी पत्ता...

जेवणानंतर विडा खाण्याची आजीआजोबांची पारंपरिक रीत कामाची, गॅस-अपचन-पित्ताचा त्रास टाळण्याचा हुकमी पत्ता...

भारतीय परंपरेमध्ये जेवणानंतर हिरवेगार पान खाणे ही केवळ सवय नसून एक आरोग्यदायी पद्धत मानली जाते. पूर्वी घराघरात जेवण झाल्यावर नागवेलीचे म्हणजेच खायचे पान दिले जात असे. आजच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये ही सवय हळूहळू कमी होत चालली असली, तरी आयुर्वेदानुसार जेवणानंतर योग्य पद्धतीने पान खाल्ल्यास त्याचा आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदा होतो. जर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणांत नागवेलीचे पान खाल्ले, तर ते एखाद्या औषधाप्रमाणेच काम करते. पचनशक्ती सुधारण्यापासून ते शरीरातील दोष दूर करण्यापर्यंत नागवेलीच्या पानाचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत(health benefits of paan leaves).

आजकाल आपल्यापैकी बऱ्याचजणांना पोटाच्या अनेक तक्रारी सतावतात. सध्या 'फास्ट फूड' खाण्याला अधिक पसंती दिली जाते, त्यातच उशिरापर्यंत जागे राहणे, सततचा मानसिक ताण आणि बदलती लाईफस्टाईल यामुळे आपल्या पचनसंस्थेवर सर्वात वाईट परिणाम होतो. परिणामी, गॅस होणे, पोट फुगणे, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि (betel leaf for gas problem) भूक न लागणे यांसारख्या समस्या आता घरोघरी पाहायला मिळतात. या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपाय सांगितले आहेत, जे आपल्या स्वयंपाकघरातच सहज उपलब्ध असतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा (paan leaf for stomach pain relief) उपाय म्हणजे 'नागवेलीचे पान'. जर या पानाचा वापर योग्य पद्धतीने केला, तर ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

औषधी गुणधर्म असलेलं नागवेलीच पानं... 

आयुर्वेदात नागवेलीच्या पानाला औषधी गुणांचा खजिना मानले गेले आहे. यामध्ये असलेली नैसर्गिक तत्वे पचन प्रक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. जेवणानंतर पान चघळल्याने तोंडात लाळ तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते. पचन क्रियेतील लाळ ही पहिली महत्त्वाची पायरी आहे. जेव्हा अन्नाचे तोंडातच नीट रूपांतर होते, तेव्हा पोटावरचा ताण कमी होतो आणि पचनसंस्थेतील एन्झाईम्स अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू लागतात.

प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं,  ९०% लोक करतात एक चूक...

झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी वाटीभर पाण्यांत मिसळा 'या' तेलाचे काही थेंब - झुरळं पळतील लांब, विषारी खडू विसरा..

जेवणांनंतर नागवेलीचे पानं खाण्याचे फायदे... 

१. गॅस आणि पोट फुगण्याची (Bloating) समस्या आजकाल अतिशय सामान्य झाली आहे. नागवेलीच्या पानात असलेली नैसर्गिक तेल आणि फायबर आतड्यांच्या हालचाली संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होते आणि पोटाची सूज किंवा फुगवट कमी होतो. याच कारणामुळे जेवणानंतर पान चघळल्याने पोट हलके वाटते आणि जडपणा दूर होतो. आयुर्वेदानुसार, नागवेलीचे पान 'वात दोष' संतुलित करते, जो गॅस आणि पोटदुखीचे मुख्य कारण मानला जातो.  

२. चुकीच्या आहारपद्धतीमुळे आजकाल ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नागवेलीच्या पानामध्ये अशी काही नैसर्गिक तत्वे आढळतात, जी पोटात तयार होणारे अतिरिक्त ॲसिड संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामुळे छातीतील किंवा पोटातील जळजळ कमी होते आणि पोटाला नैसर्गिक थंडावा मिळतो.

३. बद्धकोष्ठतेच्या समस्येवरही नागवेलीचे पान फायदेशीर ठरते. हे पान आतड्यांच्या स्नायूंना सक्रिय करते, ज्यामुळे अन्न पचनसंस्थेतून पुढे सरकणे सोपे होते आणि पोट साफ होण्यास मदत मिळते. नियमित आणि मर्यादित प्रमाणात हे खायचे पानं खाल्ल्यास पोट साफ राहण्यास मोठी मदत होऊ शकते. यासोबतच, भूक वाढवण्यासाठी देखील नागवेलीचे पान अत्यंत उपयुक्त मानले जाते. ज्या लोकांना भूक कमी लागते, त्यांच्या बाबतीत हे पान पाचक रसांना सक्रिय करून भूक वाढवण्याचे काम करते.

खरंच की काय? करण जोहर सांगतो ‘ऑझेम्पिक’ नव्हे, भात-बटाटे खाऊनच ‘असं’ केलं वजन कमी...

४. नागवेलीच्या पानांचे काम केवळ पचनापुरते मर्यादित नाही. या पानामधील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडाच्या स्वच्छतेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. हे पान तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांना येणारी सूज आणि घातक बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करते. याच कारणामुळे जुन्या काळापासून जेवणानंतर पान खाण्याची परंपरा प्रचलित आहे. इतकेच नाही तर, नागवेलीचे पान मज्जासंस्थेला आराम देते, मन शांत करते आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करते, असेही आयुर्वेदात मानले जाते.

५. याशिवाय, नागवेलीच्या पानामध्ये मुबलक प्रमाणात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास, त्वचा निरोगी राखण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. पारंपारिक औषधोपचारात दमा किंवा अस्थमा सारख्या श्वसनाच्या समस्यांवरही याचे उपयोग सांगितले गेले आहेत.

Web Title : भोजन के बाद पान: दादी माँ का उपाय पाचन, गैस, एसिडिटी के लिए।

Web Summary : भारतीय परंपरा भोजन के बाद पान को पाचन, गैस, एसिडिटी और पेट फूलने से निपटने के लिए मानती है। इसके औषधीय गुण पेट के स्वास्थ्य में मदद करते हैं, सूजन को कम करते हैं और प्रतिरक्षा को बढ़ाते हैं। चबाने से लार उत्तेजित होती है, जिससे पाचन आसान होता है, और पेट की आम बीमारियों से राहत मिलती है।

Web Title : Betel leaf after meals: Grandma's remedy for digestion, gas, acidity.

Web Summary : Indian tradition hails betel leaf after meals for digestion, combating gas, acidity, and bloating. Its medicinal properties aid gut health, reduce inflammation, and boost immunity. Chewing stimulates saliva, easing digestion, and provides relief from common stomach ailments.