Join us

रोज सकाळी खा वाटीभर भिजवलेले हिरवे चणे, हृदय राहिल निरोगी, पचनसंस्थाही सुधारेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2025 12:17 IST

Can I eat chana on an empty stomach: What happens if we eat chana daily: Does chana reduce belly fat: 7 Benefits Of Eating Kala Chana: Benefits of eating soaked Kala chana in morning: Benefits of eating soaked chana in morning for weight gain: Benefits of eating chana in empty stomach for weight: Does eating soaked chana increase weight: भिजवलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला कसे फायदे होतात जाणून घेऊया.

अनेकदा आपल्याला डॉक्टर किंवा घरातील वडीलधारी मंडळी सकाळच्या नाश्त्यात चणे खाण्याचा सल्ला देतात. (Can I eat chana on an empty stomach) बहुतेकदा आपण चणे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात खातो. चण्याची भाजी किंवा सलाद म्हणून आपण ते खातो. चणे भिजवून खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. (What happens if we eat chana daily) भिजवलेल्या चण्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त,तांबे, व्हिटॅमिन बी ३ आणि सोडियम असे अनेक आवश्यक पोषक घटक असतात.(7 Benefits Of Eating Kala Chana) यामध्ये अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहे. जे आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.  भिजवलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला कसे फायदे होतात जाणून घेऊया. ( Benefits of eating chana in empty stomach for weight)

' या' वयातच महिलांमध्ये वाढतो गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे...

1. पचनसंस्था सुधारण्यासाठी  जर आपली पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर भिजवलेले चणे खा, यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. यामुळे पोटातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. तसेच शरीर डिटॉक्सिफाय करुन पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. आपल्याला गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या वारंवार होत असेल तर भिजवलेले चणे फायदेशीर ठरु शकतात. 

2. हृदय निरोगी ठेवण्यासाठी  नियमितपणे भिजवलेले चणे खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहाते. यामध्ये अँटीऑक्सि़डंट्स, अँथोसायनिन्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असणारे घटक असतात. जे हृदयाच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्याचे काम करतात. यात असणारे पोटॅशियम, फोलेट आणि मॅग्नेशियम हृदयाला बळकट बनवते. 

सतत चिडचिड-थकवा,चक्कर येते? प्रचंड केसगळती? पाण्यात मिसळा २ पदार्थ, अशक्तपणा कमी, येईल ताकद

3. वजन कमी करण्यासाठी  भिजवलेले चणे रिकाम्या पोटी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते आणि जास्त खाण्यापासून आपला बचाव होतो. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवू शकता.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना