Join us

डोक्यात कलकलाट झाला-कामानं थकलात? रात्री प्या ‘असे’ जायफळ घालून दूध, गाढ-शांत झोप लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2025 14:46 IST

Headache - Tired of work? Drink milk with nutmeg at night, you will get a deep and peaceful sleep : रात्री झोपताना प्या जायफळाचे दूध. चव आणि झोप दोन्ही छान.

घरी असणार्‍या सुक्या मसाल्यांपैकी एक म्हणजे जायफळ. हा पदार्थ गुणांनी भरलेला आहे आणि तो दुधात घालून घेतल्यास त्याचे फायदे अधिकच वाढतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडं जायफळ किसून घातलं तर झोप एकदम शांत आणि गाढ लागते. (Headache - Tired of work? Drink milk with nutmeg at night, you will get a deep and peaceful sleep)कारण त्यात मज्जासंस्थेला शांत करण्याचे गुण असतात. जे लोक ताणतणावामुळे किंवा बेचैनीमुळे नीट झोपत नाहीत, त्यांच्यासाठी हा उपाय अगदी सोपा आणि परिणामकारक ठरतो. जायफळ घालून दूध प्यायल्याने फक्त झोपच सुधारत नाही तर पचनसंस्थाही सुरळीत राहते. रात्री पोटात दुखते किंवा गॅसेस होतात, अपचन होते तर त्यावर जायफळ घातलेले दूध पिणे हा एकदम मस्त उपाय आहे. 

जायफळात अँण्टी ऑक्सिडंट्स, अँण्टी बॅक्टेरियल आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ते शरीरातील सूज कमी करण्यात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात आणि सर्दी-खोकल्यावर आराम देण्यात मदत करते.  जायफळ दुधासोबत घेतल्याने शरीराला उब मिळते आणि थंडीमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. लहान मुलांना वारंवार पोटदुखी होत असल्यास आईने थोडं जायफळ दुधात घालून दिल्यास त्यांना लगेच आराम मिळतो. जायफळाचे दूध तुम्हीही लहानपणी नक्की प्यायले असाल. थकवा, डोकेदुखी किंवा दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी हे दूध पिणे एक नैसर्गिक औषध आहे. मात्र त्याचा वापर खूप प्रमाणात करू नये कारण जायफळ उग्र असल्याने जास्त घेतल्यास उलट त्रास होऊ शकतो.कोमट दुधात जायफळ घालून घेतल्याने मन-शरीर दोन्ही शांत होतं. 

तसेच पचनाची क्रिया जायफळामुळे अगदी सुरळीत होते. त्यातील गुणधर्मांमुळे डब्ब झालेले पोट किंवा गॅसेस कमी होतातच शिवाय शौचास जर व्यवस्थित होत नसेल तर ते ही सुधारते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा रात्री झोपताना असे दूध नक्की प्या. मस्त शांत झोप लागते. डोक्यातील विचार कमी होतात आणि मनाला शांतता मिळते. शिवाय त्वचेसाठी जायफळ फार पोषक ठरते. चेहर्‍याला जायफळाचा लेपही लावला जातो.   हा पदार्थ अनेक अंगांनी फायद्याचा ठरतो. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्नदूध