Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवाळीनंतर तुमचेही कान, घसा, डोळे दुखू लागले का? दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांना भेटा, कारण....

दिवाळीनंतर तुमचेही कान, घसा, डोळे दुखू लागले का? दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांना भेटा, कारण....

Health Tips: दिवाळीनंतर कान, घसा, डोळे दुखण्याचा त्रास अनेकांना सुरू झाला आहे. बघा त्यामागची नेमकी कारणं काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 16:30 IST2025-10-27T16:29:57+5:302025-10-27T16:30:48+5:30

Health Tips: दिवाळीनंतर कान, घसा, डोळे दुखण्याचा त्रास अनेकांना सुरू झाला आहे. बघा त्यामागची नेमकी कारणं काय...

Have you also started having ear, throat, or eye pain after Diwali? Don't ignore it, see a doctor immediately. | दिवाळीनंतर तुमचेही कान, घसा, डोळे दुखू लागले का? दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांना भेटा, कारण....

दिवाळीनंतर तुमचेही कान, घसा, डोळे दुखू लागले का? दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांना भेटा, कारण....

Highlightsकापसाने कान बंद करणे, कान कोरणे असा कोणताही प्रयोग करू नका. जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन कानाची तपासणी करून घ्या.

दिवाळीचा सण शब्दश: धुमधडाक्यात साजरा होत असतो. कारण दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करणं अनेकांना पटतच नाही. त्यातही तरुणांमध्ये तर उत्साह जरा जास्तच असतो. आपलेच फटाके सगळ्यात मोठ्या आवाजाचे असायला हवेत, यासाठी एकमेकांमध्ये जणू त्यांची चढाओढ लागलेली असते. आवाजाचे फटाके तर त्रासदायक असतातच, पण अनार, भुईचक्र, सुरसुरी या बिनआवाजी फटाक्यांमधून धुराचे लोट बाहेर पडतात आणि हवा दुषित होते. हेच सगळे दिवाळीमधले प्रदुषित वातावरण आता कित्येकांना त्रासदायक ठरत असून त्यामुळेच अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. कान दुखणे, कान बंद होणे, घशामध्ये दुखणे, खोकला येणे, कफ होणे, डोळे चुरचुरणे असे त्रासही अनेकजणांना होत आहेत. तुम्हालाही असे काही त्रास होत असतील तर ते अंगावर काढू नका..

 

'लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की दमट हवामान आणि धूर यामुळे दमा, ब्राँकायटीस असा त्रास वाढला आहे. अनेकजण छातीत कळा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे या तक्रारी घेऊन डॉक्टरांना भेटत आहेत.

Split Hair: केस कोरडे पडून टोकाला दुभंगले? ग्लिसरीनमध्ये २ गोष्टी मिसळून केसांना लावा

कारण फटाक्यांच्या धुरामध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, शिस्त आणि तांबे हे घटक जास्त प्रमाणात असतात. ते श्वसन मार्गात अडथळे निर्माण करतात. शिवाय त्यांचा अतिरेक झाला तर ते मेंदू आणि मज्जासंस्थेवरही परिणाम करतात.

 

मोठ्या आवाजामुळे कानाच्या पडद्यावर ताण येतो. दिवाळीत मोठ्या आवाजाचे फटाके फुटल्याने हा त्रास सध्या अनेकांना होत आहे. कान ठणकणे, कान बंद झाल्यासारखा वाटणे, तात्पुरता बहिरेपणा जाणवणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

दिवाळीतली शेव, चिवडा, चकली खूप उरली? त्यांच्यापासून झटपट करा २ चमचमीत पदार्थ- घ्या रेसिपी

त्यातही फटाके फोडणाऱ्या लहान मुलांना आणि तरुणांना हा त्रास जास्त होतो आहे. हा त्रास तुम्हालाही होत असेल तर कापसाने कान बंद करणे, कान कोरणे असा कोणताही प्रयोग करू नका. जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन कानाची तपासणी करून घ्या.
- डॉ. रुपाली चिटकुलवार राऊत
(वैद्यकीय तज्ज्ञ, बीड)

 

Web Title : दिवाली के बाद कान, गले, आँख में दर्द? लापरवाही न करें, डॉक्टर से मिलें!

Web Summary : दिवाली प्रदूषण से कान, गले और आँख की समस्याएँ होती हैं। डॉक्टरों ने धुएं के कारण अस्थमा और ब्रोंकाइटिस बढ़ने की चेतावनी दी है। पटाखे में सल्फर डाइऑक्साइड वायुमार्ग को परेशान करता है। परेशानी होने पर तुरंत डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Post-Diwali ailments? Don't ignore ear, throat, eye issues; see doctor!

Web Summary : Diwali's pollution causes ear, throat, and eye problems. Doctors warn of increased asthma and bronchitis due to smoke. Sulfur dioxide in firecrackers irritates airways. Seek prompt medical advice if experiencing discomfort.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.