कॅन्सरसारख्या भयंकर आजाराला आजही सगळेचजण तितकेच घाबरतात. आजच्या बदलत्या आणि धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये विविध आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, त्यात कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार ठरतो. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी कॅन्सर हे एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी लाखो लोकांना याचे निदान (Harvard Trained Gastroenterologist Suggests 3 Powerful Drinks That Can Lower Your Cancer Risk) होते आणि या आजारामुळे मोठ्या संख्येने मृत्यू होतात. या आजारावर आता अनेक उपचार निघाले आहेत. कॅन्सर झालेला व्यक्ती त्यातून पुर्णपणे बरा होऊन उत्तम निरोगी आयुष्य जगू शकतो (Harvard doctor shares 3 powerful drinks That Can Lower Your Cancer Risk) हे सुद्धा आपण अनेक उदाहरणांमधून पाहिले आहे. तरीही कॅन्सरची भीती (3 Drinks That Can Lower Your Cancer Risk) प्रत्येकालाच आहे. हा आजार झाल्यावर तो जेवढा लवकर आपल्या लक्षात येतो तेवढ्या लवकर आपण त्यातून बाहेर पडू शकतो(Doctor-Recommended Drinks That Can Lower Your Cancer Risk).
बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणाव, प्रदूषण आणि रासायनिक अन्नपदार्थ यामुळे शरीरात विषारी घटक साचू लागतात, जे कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि शरीरातून विषारी घटक बाहेर टाकणारे नैसर्गिक ड्रिंक्स पिणे उपयुक्त ठरते. आहारात काही विशिष्ट पेये समाविष्ट केल्यास कॅन्सरचा धोका कमी करता येतो, असा अनेक संशोधनांचा निष्कर्ष आहे. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट याचबरोबर, हार्वर्ड प्रशिक्षित डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत, कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये कोणत्या तीन पेयांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
कॅन्सर होण्याचा धोका कमी करणारी ३ नॅचरल ड्रिंक्स....
१. ग्रीन टी (Green Tea) :- डॉ. सौरभ सेठी यांनी यापूर्वीच ग्रीन टी हे अनेक आजारांवर उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. आता त्यांनी ग्रीन टी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या घटकांपासून पेशींचे संरक्षण करतात. माचा हा ग्रीन टी चा अधिक सर्वोत्तम प्रकार आहे आणि त्यामुळे हा ग्रीन टी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक शक्तिशाली व परिणामकारक मानला जातो.
डायबिटिस असेल तर पोहे खाणं कितपत सुरक्षित? पोषणतज्ज्ञ सांगतात, खायचेच असतील तर पोहे ‘असे’ खा...
तुमचे हृदय किती निरोगी व फिट आहे?घरच्याघरीच करा ३ टेस्ट - वेळीच घ्या हृदयाची काळजी...
२. ग्रीन स्मूदी (Green Smoothie) :- ग्रीन टी सोबतच, आपण आपल्या आहारात हिरव्या स्मूदीजचा समावेश करू शकता. या स्मूदीज पोषक तत्वांनी भरपूर आणि दाहविरोधक (anti-inflammatory) गुणधर्म असलेल्या असतात. त्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात आणि पेशींचं संरक्षण करतात. तुमच्या दिवसाची आरोग्यदायी सुरुवात करण्यासाठी ही स्मूदी एक उत्तम पर्याय आहे. ग्रीन स्मूदी तयार करण्यासाठी पालक, काकडी यांसारख्या हिरव्या भाज्या एकत्रित करून त्यात थोडे आले घालून मिक्सरमध्ये फिरवून ग्रीन स्मूदी तयार करून घ्यावी.
सतत पित्ताचा त्रास सतावतो? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात, स्वतःला लावा एक सवय - पित्त होईल कमी...
३. हळदीचे दूध (Golden (Turmeric) Milk) :- हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा अॅक्टिव्ह घटक असतो, ज्यामध्ये अँटी इंफ्लामेंटरीं (anti-inflammatory) आणि कॅन्सरविरोधी (anti-cancer) गुणधर्म असतात. हे घटक शरीरात होणाऱ्या सूज कमी करतात आणि पेशींचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. आपण बदामाच्या दुधात हळद आणि चिमूटभर काळीमिरी देखील घालू शकता. काळीमिरीमुळे कर्क्यूमिनचे शरीरातील शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे त्याचा चांगला परिणामही आपल्या आरोग्यास मिळतो.