Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अर्ध्या रात्रीपर्यंत टीव्ही, मोबाइल बघत बसता? डॉक्टर सांगतात 'या' 4 गोष्टींचा वाढू शकतो धोका!

अर्ध्या रात्रीपर्यंत टीव्ही, मोबाइल बघत बसता? डॉक्टर सांगतात 'या' 4 गोष्टींचा वाढू शकतो धोका!

Late Night Sleeping Side Effects : जे लोक कॉलेजमध्ये आहेत किंवा ज्यांना जास्त वेळ काम करावं लागतं ते अर्धी झोप घेऊनच जीवन जगत असतात. झोपेची ही बिघडती सायकल पाहून एक्सपर्ट नेहमीच लोकांना झोपेचं महत्व सांगत असतात. पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात.

By अमित इंगोले | Updated: May 12, 2025 16:00 IST2025-05-12T15:59:27+5:302025-05-12T16:00:32+5:30

Late Night Sleeping Side Effects : जे लोक कॉलेजमध्ये आहेत किंवा ज्यांना जास्त वेळ काम करावं लागतं ते अर्धी झोप घेऊनच जीवन जगत असतात. झोपेची ही बिघडती सायकल पाहून एक्सपर्ट नेहमीच लोकांना झोपेचं महत्व सांगत असतात. पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात.

Harvard doctor reveals side effects of if you regularly stay up past midnight | अर्ध्या रात्रीपर्यंत टीव्ही, मोबाइल बघत बसता? डॉक्टर सांगतात 'या' 4 गोष्टींचा वाढू शकतो धोका!

अर्ध्या रात्रीपर्यंत टीव्ही, मोबाइल बघत बसता? डॉक्टर सांगतात 'या' 4 गोष्टींचा वाढू शकतो धोका!

Late Night Sleeping Side Effects : झोपेणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. सामान्यपणे रात्री सगळेच लोक झोपतात तर काही लोक दुपारी सुद्धा झोपतात. एक्सपर्ट नेहमीच साधारण 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा सल्ला देत असतात. पण आता वेळ अशी आली आहे की, हेल्थ एक्सपर्ट्स झोपण्यासंबंधी सुद्धा सल्ला देऊ लागले आहेत. कारण लोकांची लाइफस्टाईल खूप बदलली आहे. ज्यामुळे झोप प्रभावित झाली आहे म्हणा की, झोपेची वेळ कमी झाली आहे असं म्हणा. जास्त वेळ जागणं जास्तीत जास्त लोकांचं डेली रूटीन बनलं आहे.

जे लोक कॉलेजमध्ये आहेत किंवा ज्यांना जास्त वेळ काम करावं लागतं ते अर्धी झोप घेऊनच जीवन जगत असतात. झोपेची ही बिघडती सायकल पाहून एक्सपर्ट नेहमीच लोकांना झोपेचं महत्व सांगत असतात. पण तरीही लोक याकडे दुर्लक्ष करतात.

अनेक शोधांमधून झोपेच्या खराब क्वालिटीचे दुष्परिणाम आणि पुरेशा झोपेतचे फायदे याबाबत सांगण्यात आलं आहे. अलिकडेच एका अमेरिकन डॉक्टरांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आपणं अर्ध्या रात्रीपर्यंत जागण्याचे आपल्या मेंदुवर काय परिणाम होतात याबाबत माहिती दिली आहे. तेच जाणून घेऊया.

भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर सौरभ सेठी यांनी सोशल मीडिया याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, जर तुम्ही नेहमीच अर्ध्या रात्रीपर्यंत जागरण करत असाल तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

रात्री उशीरापर्यंत जागण्याचे दुष्परिणाम

वजन वाढतं

डॉक्टरांनुसार, जर तुम्ही रोज रात्री उशीरापर्यंत जागत असाल तर तुमचं वजन वाढण्याचा अधिक धोका असतो. कारण रात्री जागल्यानं भूक वाढते. सोबतच हार्मोन्सही असंतुलित होतात. ज्यामुळे तुमचं वजन अधिक वाढतं.

मूडवर पडतो प्रभाव

जर तुम्ही जास्त वेळ जागरण करत असाल आणि रोज 7 ते 8 तासांची झोप घेत नसाल तर याचा तुमच्या मूडवरही प्रभाव पडतो. तुमची चिडचिड वाढते आणि तुमच्या कामावरही याचा प्रभाव दिसून येतो.

स्ट्रेस वाढतो

डॉक्टर म्हणाले की, रोज रात्री उशीरापर्यंत जागण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुमची स्ट्रेस लेव्हल अधिक जास्त वाढू  शकते. वाढलेल्या स्ट्रेसचा तुमच्या एकंदर आरोग्यावरही प्रभाव दिसून येतो.

विचार करण्यात समस्या

वरील वेगवेगळ्या समस्या तर होतातच, सोबतच जर तुम्ही रोज रात्री झोपण्यास उशीर करत असाल तर तुमच विचार करण्याची क्षमता देखील कमी होते. एकाग्रता कमी होते.

काय कराल उपाय?

डॉक्टरांनी सल्ला दिला की, वरील वेगवेगळ्या शारीरिक आणि मानसिक समस्या टाळायच्या असतील तर अर्ध्या रात्रीपर्यंत जागू नका. टीव्ही, मोबाइल जास्त बघू नका. रोज झोपण्याची एक वेळ ठरवा आणि ती फॉलो करा. यानं तुमचं एकंदर आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळेल. महत्वाची बाब म्हणजे रोज किमान 7 ते 8 तासांची झोप घ्या.

Web Title: Harvard doctor reveals side effects of if you regularly stay up past midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.