'हृदय' हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव... हृदय जोपर्यंत सुरळीत चालते, तोपर्यंत आयुष्य आनंदी असते. मात्र, सध्याच्या काळात हार्ट ॲटॅक येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये आपण कामाच्या गडबडीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय. विशेषतः 'हृदयविकार' हा आता केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तरुणांमध्येही याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे(habits to reduce heart attack risk).
हार्ट ॲटॅक अचानक येत असला तरी त्यामागील अनेक लक्षणे आधीपासून आपल्या शरीरात तयार होत असतात. जर आपण योग्य वेळेतच योग्य खबरदारी घेतली, डेली रुटीनमध्ये छोटे-छोटे बदल केले आणि आरोग्याची नियमित तपासणी केली, तर हार्ट ॲटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. त्यामुळे हृदय निरोगी (habits to keep your heart healthy) ठेवण्यासाठी कोणत्या सवयी स्वतःला लावून घाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या डेली रुटीनमध्ये थोडे महत्त्वाचे बदल करून आपण हार्ट ॲटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. हार्ट ॲटॅक येऊच नये यासाठी आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्य या त्रिसूत्रीचा वापर कसा करावा आणि कोणती पूर्वखबरदारी घ्यावी याबद्दल इंस्टाग्रामवर डॉ. अदितिज धमिजा यांनी ५ सवयींबद्दल सांगितले आहे. या खास सवयींमुळे हार्ट ॲटॅकचा धोका कमी करण्यास आणि डॅमेज (heart attack prevention tips by doctors) झालेले हृदय पूर्ववत करण्यास मदत करू शकतात.
हार्ट ॲटॅक येऊच नये यासाठी स्वतःला लावा ५ चांगल्या सवयी...
१. आहारापासून सुरुवात करा :- आपण सर्वजण जाणतो की निरोगी राहण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. निरोगी हृदयासाठी जर तुम्ही चांगल्या सवयी स्वतःला लावून घेत असाल, तर सर्वात आधी आहारापासून सुरुवात करा. 'हाय प्रोटीन' आणि 'लो सॅच्युरेटेड फॅट्स' असलेला आहार तुमचे हृदय सुरक्षित ठेवेल.
२. आठवड्यात १५० मिनिटे व्यायाम :- आजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी आणि आपले काम पूर्ण करण्यासाठी धावत आहे. अशा परिस्थितीत आपण स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत आहेत. हार्ट ॲटॅक टाळण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट जी लोक विसरतात ती म्हणजे एक्सरसाइज. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम केलात, तुम्ही हार्ट ॲटॅकचा धोका बराच कमी करू शकता. यामध्ये 'वेट ट्रेनिंग' केल्याने सर्वाधिक फायदा होईल.
जिम - डाएट करूनही वजन कमीच होत नाही? मग स्वयंपाकाची ‘अशी’ रीत बदला, वजन घटायला लागेल झरझर...
३. कमीत कमी ६ तासांची झोप आवश्यक :- पुरेशी झोप घेतल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. परंतु, नीट झोप न मिळाल्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शरीराला विश्रांती देण्यासाठी दररोज किमान ६ तासांची पुरेशी झोप नक्की घ्या.
खा फळं बिंधास्त वाढणार नाही शुगर-फळांवर ‘हा’ मसाला चिमुटभर भुरभुरायला मात्र विसरु नका...
४. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करा :- तज्ज्ञ सल्ला देतात की काही ठराविक चाचण्या प्रत्येकाने नियमितपणे करून घेतल्या पाहिजेत. यामध्ये ब्लड टेस्ट, बीपी टेस्ट (रक्तदाब) यासोबतच ApoB किंवा Lp(a), HbA1c आणि लिपिड प्रोफाईल चाचण्यांचा समावेश आहे. नियमित तपासणीमुळे तुमच्या शरीरात काय बदल होत आहेत, याची माहिती मिळते.
५. धुम्रपान सोडा (Quit Smoking) :- तज्ज्ञांच्या मते, जर भारतातील अनेक लोकांनी ही एक सवय लावून घेतली, तर हार्ट ॲटॅकची निम्मी प्रकरणे कमी होतील.संशोधनानुसार, ज्या दिवशी तुम्ही धुम्रपान सोडता, त्याच दिवसापासून हार्ट ॲटॅकचा धोका सर्वात जास्त कमी होण्यास सुरुवात होते.
Web Summary : Incorporate these five daily habits to significantly lower your risk of heart attack. Focus on a high-protein, low-fat diet, 150 minutes of weekly exercise, sufficient sleep, regular medical checkups, and quitting smoking for a healthier heart.
Web Summary : हृदयघात के खतरे को कम करने के लिए इन पांच दैनिक आदतों को अपनाएं। स्वस्थ हृदय के लिए उच्च प्रोटीन, कम वसा वाला आहार, 150 मिनट का साप्ताहिक व्यायाम, पर्याप्त नींद, नियमित चिकित्सा जांच और धूम्रपान छोड़ना ज़रूरी है।