lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूध घातलेला चहा पिणं सोडा, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सल्ला! चहा प्यायचाच असेल तर....

दूध घातलेला चहा पिणं सोडा, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सल्ला! चहा प्यायचाच असेल तर....

Guidelines about consumption of tea or coffee: तुम्हीही चहा किंवा कॉफीचे शौकिन असाल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने दिलेला हा सल्ला एकदा वाचाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 04:09 PM2024-05-15T16:09:58+5:302024-05-15T16:11:01+5:30

Guidelines about consumption of tea or coffee: तुम्हीही चहा किंवा कॉफीचे शौकिन असाल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने दिलेला हा सल्ला एकदा वाचाच...

Guidelines about consumption of tea or coffee by Indian Council of Medical Research, side effects of tea and coffee, ideal quantity for having tea and coffee | दूध घातलेला चहा पिणं सोडा, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सल्ला! चहा प्यायचाच असेल तर....

दूध घातलेला चहा पिणं सोडा, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सल्ला! चहा प्यायचाच असेल तर....

Highlightsआयसीएमआरच्या अभ्यासकांनी चहा- कॉफी पिण्यासंबंधी नुकतीच एक गाईडलाईन प्रसिद्ध केली आहे.

आपल्याकडे बरेच लोक असे आहेत ज्यांना चहा आणि कॉफी पिण्यासाठी फक्त निमित्त लागतं. मग ती दिवसातली कोणतीही वेळ का असेना. जेवणाच्या आधी, जेवणाच्यानंतर, रात्री झोपण्यापुर्वी, सकाळी झोपेतून उठल्यावर असं कोणत्याही वेळी काही लोक अगदी सहज चहा घेऊ शकतात. तुम्हालाही अशीच सवय असेल तर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेला सल्ला एकदा वाचा.. (Guidelines about consumption of tea or coffee by ICMR) असा दूध घातलेला चहा किंवा कॉफी कोणत्याही वेळी घेतली तर त्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अहवाल त्यांनी नुकताच प्रसिद्ध केला आहे. 

 

आयसीएमआरच्या अभ्यासकांनी चहा- कॉफी पिण्यासंबंधी नुकतीच एक गाईडलाईन प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की चहा किंवा कॉफी तुम्ही जास्त प्रमाणात पित असाल तर त्यातून तुमच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात कॅफिन जातं. कॅफिनमुळे शरीरामध्ये लोह शोषून घेण्यास अडचणी येतात.

केसांना भरभरून पोषण देणारे ६ पदार्थ, रोजच खा- केसांचं गळणं होईल बंद, वाढतील भराभर...

यामुळे अनेकांच्या शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ॲनिमियाचा त्रास वाढतो, असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी तर दूध घातलेला चहा किंवा कॉफी तर घेऊ नयेच पण जेवणानंतर किंवा नाश्त्यानंतर एक तास आणि जेवणापुर्वी किंवा नाश्त्यापुर्वी एक तास तरी चहा- कॉफीचे सेवन करू नये. कारण त्यामुळे आहारातील लोह रक्तात मिसळण्यास अडचणी येतात. 

 

चहा- कॉफीच्या एका कपात किती कॅफिन असते?

ICMR ने दिलेल्या अहवालानुसार दिवसातून ३०० मिलीग्रॅम एवढं कॅफीन तुम्ही सेवन करत असाल तर ते ठीक आहे. एक कप कॉफी प्यायल्याने एकावेळी तुमच्या शरीरात ८० ते १२० मिलीग्रॅम कॅफीन जाते. जर ती इंस्टंट कॉफी असेल तर त्यातून ५० ते ६६ मिलीग्रॅम कॅफिन मिळते.

उन्हाळ्यात कोथिंबीर लवकर सुकते? २ उपाय- कोथिंबीर राहील जास्त दिवस फ्रेश- हिरवीगार 

तर तोच जर चहाचा कप असेल तर त्यातून ३० ते ६५ मिलीग्रॅम कॅफीन पोटात जाते. दूध घालून केलेल्या चहा- कॉफीपेक्षा कोरी किंवा बिनादुध चहा- कॉफी घेण्यास प्राधान्य द्यावे. कारण त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि धमन्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो, अशी सूचनाही ICMR ने केली आहे. 

 

Web Title: Guidelines about consumption of tea or coffee by Indian Council of Medical Research, side effects of tea and coffee, ideal quantity for having tea and coffee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.