पुर्वी असं समजलं जायचं की ज्या व्यक्तीचे केस पांढरे असतात ती व्यक्ती वयस्कर असते. म्हणजेच पांढरे केस हे म्हातारपणाचं एक लक्षण समजलं जायचं. पण आता मात्र पांढऱ्या केसांचा आणि वाढलेल्या वयाचा काहीही संबंध राहिलेला नाही. कारण कमी वयातच कित्येकांचे केस पांढरे होत आहेत. कॉलेजमध्ये जाणाऱ्याही मुलांचे केस पांढरे होत आहेत. कमी वयात थोडे केस पांढरे झाले असतील तर त्यासाठी इतरही कित्येक कारणं असतात. पण केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप झपाट्याने वाढायला लागलं असेल तर ती मात्र एक चिंतेची बाब असू शकते असं तज्ज्ञ सांगत आहेत.
पांढऱ्या केसांचा आणि कॅन्सरचा काय संबंध?
इंडिया टीव्ही न्यूजने दिलेल्या माहितीनुसार डॉ. विवेक बांदे असं सांगतात की तिशीच्या आधी पुरुषांचे आणि पंचविशीच्या आधी स्त्रियांचे केस झपाट्याने पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर त्यामध्ये त्यांच्या शरीरातला ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस वाढणे किंवा मग सेल्युलर डॅमेज होणे ही कारणं असू शकतात.
घरोघरी गोकर्णाचा वेल असायलाच हवा, कारण.... बघा गोकर्णाच्या फुलांचे ४ आरोग्यदायी फायदे
या दोन्ही क्रिया जेव्हा शरीरात खूप वेगाने होऊ लागतात तेव्हा कॅन्सरचा धोका वाढत जातो. जेव्हा फ्री रॅडिकल्स एकत्र येतात आणि शरीरातल्या पेशींना त्रास देऊ लागतात तेव्हा शरीरातला ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस वाढत जातो. याचा परिणाम केवळ केसांच्या रंगावरच होत नाही तर आपल्या डिएनए आणि शरीरातल्या इतर पेशी, टिश्यू यांच्यावरही होत असतो.
डॉक्टरांनी असंही सांगितलं आहे की केस झपाट्याने पांढरे होणे म्हणजे त्यामागे कॅन्सर हेच कारण आहे असं नाही. पण तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानुसार आहार बदलावा. आपल्या शरीरात कोणत्या घटकांची कमतरता आहे हे ब्लड टेस्ट करून जाणून घ्या.
विकतचे मसाले कशाला? घरीच तयार करा सुपरटेस्टी मसाला- भाजी, पराठे, आमटीला येईल झकास चव
त्यानुसार आहार घ्या. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने काही सप्लिमेंट्स सुरू करा. अपुरे पोषण, प्रदुषण, क्रॉनिक स्ट्रेस, अनुवंशिकता ही देखील केस पांढरे होण्याची कारणं असू शकतात. त्यामुळे केस कमी वयात पांढरे होणं हे तुमचं शरीर तुम्हाला देत असलेली एक सुचना आहे आणि ती समजून घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात. 
 
