Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > काच - प्लॅस्टिक की स्टील? डॉक्टर सांगतात, लंच बॉक्स म्हणून कोणत्या मटेरियलचा डबा वापरणे सुरक्षित....

काच - प्लॅस्टिक की स्टील? डॉक्टर सांगतात, लंच बॉक्स म्हणून कोणत्या मटेरियलचा डबा वापरणे सुरक्षित....

Glass Vs Plastic Lunch Box Which One Is Healthy Doctor Tells : Why Glass Utensils Are Safer Than Plastic Ones. Here’s Why : Why you must carry that heavy glass 'dabba' to work for lunch : लंच बॉक्स नेमका कोणत्या मटेरियलपासून तयार केलेला असावा ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 16:30 IST2025-05-27T16:19:50+5:302025-05-27T16:30:29+5:30

Glass Vs Plastic Lunch Box Which One Is Healthy Doctor Tells : Why Glass Utensils Are Safer Than Plastic Ones. Here’s Why : Why you must carry that heavy glass 'dabba' to work for lunch : लंच बॉक्स नेमका कोणत्या मटेरियलपासून तयार केलेला असावा ते पाहूयात.

Glass Vs Plastic Lunch Box Which One Is Healthy Doctor Tells Why Glass Utensils Are Safer Than Plastic Ones. Here’s Why Why you must carry that heavy glass 'dabba' to work for lunch | काच - प्लॅस्टिक की स्टील? डॉक्टर सांगतात, लंच बॉक्स म्हणून कोणत्या मटेरियलचा डबा वापरणे सुरक्षित....

काच - प्लॅस्टिक की स्टील? डॉक्टर सांगतात, लंच बॉक्स म्हणून कोणत्या मटेरियलचा डबा वापरणे सुरक्षित....

घरातील लहान मुलं आणि इतर व्यक्ती शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जाताना दुपारच्या जेवणाचा डबा सोबत घेऊनच निघतात. जेवणाचा डबा सोबत नेताना आपण शक्यतो(Glass Vs Plastic Lunch Box Which One Is Healthy Doctor Tells) वेगवेगळ्या मटेरिअलपासून तयार केलेल्या डब्यांचा वापर करतो. लंच बॉक्ससारखी रोजच्या वापरातील वस्तू आरोग्याच्या दृष्टीने योग्य निवडणे फार महत्त्वाचे ठरते. सध्या बाजारात स्टील, ग्लास, सिलिकॉन आणि (Why Glass Utensils Are Safer Than Plastic Ones. Here’s Why) विविध प्रकारचे प्लॅस्टिक लंच बॉक्स उपलब्ध आहेत, पण त्यापैकी खरोखर आरोग्यासाठी सुरक्षित असा कोणत्या मटेरियलचा लंच बॉक्स आहे, असा प्रश्न आपल्याला पडतो(Why you must carry that heavy glass 'dabba' to work for lunch).

आपल्यापैकी काहीजण प्लास्टिकचा तर काहीजण स्टीलचा डबा वापरतात. एवढेच नाही तर, काहीजण काचेच्या किंवा इतर मटेरियल पासून तयार केलेल्या डब्यांचा वापर करतात. त्याचवेळी, काहीजण ॲल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर अन्नपदार्थ रॅपिंग करण्यासाठी वापरतात. प्लास्टिकमध्ये अन्नपदार्थ  पॅकिंग करणे सामान्यतः सुरक्षित मानले जात नाही. कारण प्लास्टिकचा लंच बॉक्स बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक पदार्थ आरोग्यासाठी सुरक्षित मानले जात नाही. यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, प्लास्टिकच्या लंच बॉक्समध्ये अन्नपदार्थ ठेवल्याने काहीवेळा अन्नपदार्थांच्या चवीवरही परिणाम होतो. दिल्लीतील अग्रवाल होमिओपॅथी क्लिनिकचे डॉ. पंकज अग्रवाल यांनी onlymyhealth.com ला दिलेल्या मुलाखतीनुसार, लंच बॉक्स नेमका कोणत्या मटेरियलपासून तयार केलेला असावा ते पाहूयात. 

कोणता लंच बॉक्स आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

डॉक्टरांच्या मते, काचेच्या आणि प्लास्टिकच्या डब्यांमध्ये तुलना केली असता, काचेचा डब्बा लंच बॉक्स म्हणून वापरणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित मानले जाते. याउलट, प्लॅस्टिकच्या डब्यात अन्नपदार्थ स्टोअर करणे किंवा खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे घातक ठरू शकते. खरंतर, प्लॅस्टिक तयार करताना बिस्फेनॉल-ए (BPA) नावाचं रसायन वापरलं जातं. हे रसायन शरीरासाठी अत्यंत अपायकारक आहे. जेव्हा गरम अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवले जातात किंवा प्लॅस्टिकचा डबा मायक्रोवेव्हमध्ये गरम केला जातो, तेव्हा त्यातील BPA अन्नामध्ये मिसळेले जाते, नंतर तेच अन्नपदार्थ  जेव्हा आपण खातो, तेव्हा हे घातक रसायन आपल्या पोटात जाते. यामुळे दीर्घकाळ प्लॅस्टिकच्या डब्यांचा वापर केल्यास विविध प्रकारचे आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर लंच बॉक्स म्हणून काचेचे किंवा स्टीलचे डबे वापरण्याचा सल्ला देतात. 

अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...

काचेचा लंच बॉक्स आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित... 

काचेमध्ये असे कोणतेही रसायन आढळत नाही जे आरोग्याला हानी पोहोचवू शकते. काचेच्या भांड्यात किंवा जेवणाच्या डब्यात अन्नपदार्थ गरम केल्याने आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही, तसेच त्यातील रसायने अन्नात विरघळत नाहीत. याशिवाय, काचेच्या डब्यांत अन्नपदार्थ स्टोअर करून ठेवल्यास त्यात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही.

अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरू नका! WHO ने सांगितलेले 'हे' उपाय, उच्च रक्तदाब नियंत्रणात...

लंच बॉक्स म्हणून काचेच्या डब्यांचा वापर केल्याने, त्यातील अन्नपदार्थ दीर्घकाळ सुरक्षित आणि ताजे राहतात. यासाठीच, जर आपण प्लॅस्टिकच्या डब्यांचा वापर करत असाल तर तुमची सवय बदला आणि काचेच्या लंच बॉक्सची निवड करा. तुम्हाला फक्त इतकी काळजी घ्यायची आहे की काचेचा डबा कुठूनही फुटणार नाही जेणेकरून त्याचे कण तुमच्या अन्नपदार्थात मिसळणार नाहीत, याची कायम खबरदारी घ्यावी. 

प्लॅस्टिकच्या डब्यांत अन्नपदार्थ स्टोअर करण्याचे नुकसान... 

१. प्लॅस्टिकच्या डब्यात अन्नपदार्थ खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक ठरु शकते.  
२. प्लॅस्टिकच्या जेवणाच्या डब्यात जेवल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटदुखी आणि सूज येऊ शकते.
३. प्लॅस्टिकच्या डब्यांत असणारी रसायने देखील अनेक प्रकरणांमध्ये कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
४. प्लॅस्टिकच्या डब्यांत ठेवून अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरात हार्मोनल असंतुलनाची समस्या देखील उद्भवू शकते. 
५. प्लॅस्टिकच्या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्याने तुमची चयापचय प्रक्रिया मंदावू शकते.
६. यामुळे शरीरात हानिकारक बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते.

Web Title: Glass Vs Plastic Lunch Box Which One Is Healthy Doctor Tells Why Glass Utensils Are Safer Than Plastic Ones. Here’s Why Why you must carry that heavy glass 'dabba' to work for lunch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.