Garlic For Cholesterol : कोलेस्टेरॉल हा शब्द आजकाल सगळ्यांनाच परिचीत झाला आहे. कोलेस्टेरॉल दोन प्रकारचे असतात एक बॅड कोलेस्टेरॉल आणि एक गुड कोलेस्टेरॉल. हे एकप्रकारचं फॅट आहे. जे शरीरात सेल्स आणि हार्मोन निर्माण करण्यास मदत करतं. मात्र, जेव्हा बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढतं तेव्हा समस्या वाढते. बॅड कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्त पुरवठ्यात अडथळ निर्माण करतं. ज्यामुळे हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होतात.
एक्सपर्ट सांगतात की, शरीरात जर बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल वाढण्याची वेगेवगळी कारणे असतात ज्यात खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचाल कमी करणे, लठ्ठपणा, धुम्रपान आणि मद्यसेवन यांच्या समावेश आहे. अशात वाढलेलं कोलेस्टेरॉल कमी करणं खूप गरजेचं असतं. यावर एक उपाय म्हणजे लसूण आहे.
कोलेस्टेरॉल कमी करतो लसूण
लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं. तसेच यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, सेलेनियम, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि मॅगनिज भरपूर प्रमाणात असतं. अशात कच्च्या लसणाचं सेवन केल्याने आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. सोबतच याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
कच्चा लसूण अधिक प्रभावी
कच्च्या लसणाचं नियमितपणे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो. तसेच याने शरीरात जमा झालेल्या बॅड कोलेस्टेरॉलची लेव्हलही कमी करता येते आणि गुड कोलेस्टेरॉल वाढतं. ज्यामुळे धमण्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो. अशात कच्च्या लसणाचं सेवन कसं करावं हे जाणून घेऊ.
मध आणि कच्चा लसूण
लसणाच्या तीन ते चार कळ्यात बारीक करून त्यात एक चमचा मध टाका. सकाळी उपाशीपोटी या पेस्ट सेवन केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं. सोबतच याने आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
लिंबाच्या रसासोबत
लसणाच्या तीन ते चार कळ्या बारीक करून त्यात लिंबाचा रस मिक्स करा. या मिश्रणाचं सेवन करा आणि एक ग्लास पाणी प्यावे. याच्या सेवनाने आपल्या नसांमध्ये जमा विषारी तत्वही बाहेर पडतात आणि ब्लॉकेजची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
लसणाच्या कळ्या
सकाळी उपाशीपोटी केवळ लसणाच्या एक ते दोन कळ्या चावूनही खाऊ शकता. उपाशीपोटी खाल्ल्याने याचा फायदा अधिक मिळतो.