Join us

लसूण आणि लिंबाचा रस कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ठरतो फायदेशीर, अभ्यासाचा दावा- टळतो हृदयरोगाचा धोका..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:25 IST

How To Reduce Cholesterol: हा उपाय तसा करायला सोपा आहे.

How To Reduce Cholesterol: सतत आपण ऐकत किंवा वाचत असतो की, आजकाल वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका वाढला आहे. हृदयरोगांमुळे जगभरातील हजारो लोक जीव गमावतात. सोबतच हृदयरोग वाढण्याची वेगवेगळी कारणंही सांगितली जातात. ज्यात हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल आणि सूज यांसारख्या कारणं असतात. अशात ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवणं आणि कोलेस्टेरॉलची लेव्हल संतुलित ठेवणं खूप महत्वाचं ठरतं. NCBI मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार,  किचनमधील लसूण कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करतो.

एका रिसर्चमधून समोर आलं की, लसूण आणि लिंबू जर एकत्र खाल तर हार्ट अ‍ॅटॅकला जबाबदार कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळू शकते. लसणातील इम्यून बूस्टिंग, अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट गुणांमुळे याचे हृदयाला अनेक फायदे मिळतात. कोलेस्टेरॉल एक चिकट पदार्थ असतो जो आपल्या नसांमध्ये जमा होतो. याचं प्रमाण वाढलं तर ब्लड फ्लो कमी होतो आणि हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो.

लसूण आणि लिंबानं कमी होईल कोलेस्टेरॉल

अभ्यासकांनी सांगितलं की, लसणामध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. लसूण आणि लिंबाचा रस सोबत खाल्ल्यास हायपर लिपिडिमियाच्या रूग्णांच्या लिपीड लेव्हल, फायब्रिनोजेन आणि ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा होते. रिसर्चमधून समोर आलं की, दररोज लसणाची अर्धी किवा एक कळी खाल्ली तर कोलेस्टेरॉल लेव्हल जवळपास १० टक्के कमी होते.

लसणाने हृदय कसं निरोगी राहतं

लसूण आपल्या बायोअ‍ॅक्टिव तत्व अ‍ॅलिसिन आणि इतर घटक जसे की, डायलिल डायसल्फाइड आणि एस-एलसिस्सीस्टीनमुळे शक्तीशाली जडीबुटी ठरतं. अभ्यासक असं मानतात की, लसणातील पोषक तत्व हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात.

अ‍ॅंटी-ऑक्सीडेंटचा खजिना लसूण-लिंबू

लसणामध्ये व्हिटामिन सी असतं जे एक शक्तीशाली अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट असतं. याने हृदयाचा फ्री रॅंडिकलपासून होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो. व्हिटामिन बी6 हेल्दी रेड सेल्स वाढवण्यास मदत करतं आणि हार्ट डिजीजचा धोकाही कमी होतो.

कच्चा लसूण नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कमी केलं जाऊ शकतं.   कोलेस्टेरॉल आणि लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. 

टॅग्स : हृदयरोगहृदयविकाराचा झटकाहेल्थ टिप्स