Join us

आठवड्यातून दोनदा करा 'या' पदार्थांनी गुळण्या, सर्दी-खोकल्यासह संसर्गजन्य आजार टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 15:53 IST

gargle twice a week, it is very helpful for your health, see how to gargle properly : आठवड्यातून दोनदा तरी गुळण्या करा. पाहा फायदे.

कोणताही महिना असो सर्दी, खोकला, ताप असे त्रास कायम होतात. सगळ्यात जास्त त्रास होतो तो घशाला. काही खायचे म्हटले तरी त्रास होतात. तसेच या त्रासांचे जंतुही शरीरात घशावाटेच जातात. त्यामुळे घशाची काळजी घेणे फार गरजेचे असते. त्यासाठी फार काही औषधे वगैरे घ्यायची गरज नाही. (gargle twice a week, it is very helpful for your health, see how to gargle properly )आठवड्यातून दोनदा फक्त गरम पाण्याने गुळण्या करा. घशाला आराम मिळतो आणि जंतुही मरतात. शिवाय अगदी पटकन करता येणारा उपाय आहे. फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. तसेच अगदी पाच मिनिटांत गुळण्या करुन होतात.   

गरम पाण्याने आठवड्यातून किमान दोनदा गुळण्या करणे ही अतिशय सोपी पण प्रभावी सवय आहे. कोमट पाणी घशातील व तोंडातील जंतू नष्ट करून स्वच्छता राखते आणि संसर्ग होण्याचा धोका कमी करते. रोजच्या धावपळीत तोंडाची योग्य काळजी घेतली जात नाही, त्यामुळे दातांवर जंतू वाढतात. हिरड्यांना सूज येते, घसा वारंवार खवखवतो किंवा सर्दी-खोकला होतो. अशा वेळी गरम पाण्याच्या गुळण्यांचा उपयोग होतो. कोमट पाण्यामुळे घशातील वेदना कमी होतात. तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते आणि हिरड्यांना बळकटी मिळते.

गुळण्या केल्यावर रक्ताभिसरण सुधारते आणि तोंडातील सूक्ष्म जखमा लवकर भरुन येतात. गुळण्यांच्या पाण्यात वेगवेगळे नैसर्गिक पदार्थ घातल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात. जसे की मीठ घालून गुळण्या करणे घशासाठी फारच फायद्याचे ठरते. घशातील सूज, खवखव व वेदना कमी होतात आणि जीवाणू नष्ट होतात. हळद घालून गुळण्या केल्यास तिच्या जंतुनाशक आणि दाहनाशक गुणधर्मांमुळे तोंडातील तसेच घशातील संक्रमण आटोक्यात राहते.

तोंडातील दुर्गंधी नाहीशी करण्यासाठीही गुळण्या फायद्याच्या आहेत. हिरड्यांची सुजही गुळण्या केल्याने कमी होते. तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने कानाचे दुखणे, घशाचे दुखणेही कमी होते. तुरटीमुळे अनेक फायदे मिळतात. आवाजही मोकळा होतो. 

मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे फक्त घशासाठीच नाही तर पित्ताचा त्रास होणार्‍यासाठीही फायद्याचे आहे. मीठामुळे स्वच्छता होते आणि अपचन होण्याची शक्यता जरा कमी होते. घशात अडकलेले अन्न बाहेर पडून जाते. त्यामुळे मीठाच्या पाण्याने गुळण्या करणेही फायद्याचेच आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडी