सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपला रोजचा दिनक्रम ठरलेला असतो.(Urine infection) ७ ते ८ तास पुरेशी झोप घेतल्यानंतर आपल्याला लघवीला किंवा टॉयलेटला येते.(Home remedies for frequent urination) ही एक सामान्य घटना जरी असली तरी अनेकांची तक्रार असते की, पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवी येते. त्यामुळे आपण कमी पाणी पितो. ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. (Frequent urination and hydration)
या प्रकारची समस्या विशेषत: महिला, वयोवृद्ध, मधुमेह किंवा प्रोस्टेटच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये दिसून येतात. जीवनशैलीत काही बदल केल्यास आपल्याला यावर नियंत्रण ठेवता येते.(7 habits change) अनेकदा हा त्रास इतका वाढतो की, आपल्याला लघवीच्या ठिकाणी जळजळ होते- खाज सुटू लागते. वारंवार लघवी होण्याची समस्या नैसर्गिक पद्धतीने कशी दूर करायची पाहूया.
वजन कमी करण्यासाठी रोज चावून खा ही 'हिरवीगार पानं', पोट- मांड्यांवरची चरबी होईल कमी
1. आपल्याला वारंवार लघवी येत असेल तर आपण पाणी किती प्रमाणात पितो याकडे लक्ष द्यायला हवे. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होते. तसेच एकाच वेळी भरपूर पाणी प्यायल्याने देखील त्रास होऊ शकतो. दिवसातून दीड ते दोन लीटर पाणी प्या. पाणी पिताना हळूहळू आणि थोडे थोडे प्या. रात्री झोपण्यापूर्वी २ ते ३ तासाआधी पाणी पिऊ नका, ज्यामुळे रात्री उठावे लागणार नाही.
2. काही पदार्थ खाल्ल्याने आपल्याला वारंवार लघवीला येते. जसे की कॉफी, चहा, कोल्ड्रिंक्स, अल्कोहोल, मसालेदार अन्न, लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो आणि चॉकलेट सारखे पदार्थ वारंवार लघवी येण्यास उत्तेजित करतात. त्यासाठी आपल्याला आहाराकडे लक्ष द्यायला हवे. या पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे.
3. वारंवार लघवी येण्याची समस्या कमी करण्यासाठी व्यायाम हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ज्यामुळे पेल्विक फ्लोर स्नायूंना ताकद मिळते. जे आपल्या लघवीवर नियंत्रण ठेवतात. त्यासाठी दिवसातून ५ ते १० मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा.
4. अनेकदा डॉक्टर आपल्याला मूत्राशय प्रशिक्षण घेण्याचा सल्ला देतात. यामध्ये लघवी आल्यानंतर ती थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे लघवी अधिक वेळ थांबवण्याची क्षमता वाढते.
ChatGPT ची कमाल! पठ्ठयानं दीड महिन्यात केलं ११ किलो वजन कमी, AI ने सांगितलं ४ पदार्थ खाऊ नकाच..
5. जास्त वजन किंवा वजन झपाट्याने वाढणाऱ्या लोकांमध्ये लघवी वारंवार होण्याची समस्या वाढते. यामध्ये पोटाचा दाब मूत्राशयावर पडतो. अशावेळी वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी दररोज थोडा वेळ काढा. योगा, व्यायाम करा, शारीरिक हालचाली वाढवा.
6. सिगारेटमध्ये असलेले निकोटीन मूत्राशयला नुकसान पोहोचवते. तसेच जास्त मीठाचे सेवन केल्याने शरीरात पाणी साचते आणि लघवीचे प्रमाण वाढते. अशावेळी धूम्रपान करणे टाळा, जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा.
7. अतिरिक्त प्रमाणात ताण किंवा चिंता वाढल्याने त्याचा परिणाम मूत्राशयावर होतो. त्यासाठी ताण घेणे टाळा. योग किंवा ध्यानाची मदत घ्या. ज्यामुळे स्ट्रेस कमी होईल.