सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेक जण रात्रीचे उरलेलं जेवण दुपारी आणि दुपारीचे उरलेलं जेवण रात्री खाण्याची सवय असते. (Dangerous Stale Foods to Avoid) सकाळचा नाश्ता, टिफिन आणि जेवण बनवण्यासाठी घाई होऊ नये म्हणून अनेकजण रात्रीच इतर गोष्टी करुन ठेवतात. (Unsafe Stale Food Items) परंतु, काही शिळे पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. (Health Risks of Eating Stale Food)
आपण नेहमीच ताजे अन्न खायला हवे. शिळे अन्न केवळ चवीलाच वाईट नसते तर त्यात असणारे बॅक्टेरिया वाढून शरीराला हानी पोहोचवतात. (How Stale Food Affects Your Health) यामुळे आपल्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही फ्रिजमध्ये ठेवलेल शिळे अन्न खाण्याची सवय असेल तर आताच थांबा, नाहीतर अनेक आजारांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. (Foods to Never Eat Past Their Prime)
महाराष्ट्रात आवडीने खाल्ले जातात असे भाताचे ७ प्रकार, फोडणीचा भात ते बिर्याणी, घरोघरी भात हवाच!
1. हिरव्या भाज्या
आठवड्याभराचा भाजीपाला आपण एकाच दिवशी आणतो. परंतु, ते अधिक काळ टिकत नाही. त्यासाठी काहीजण पालक, मेथीसारख्या पालेभाज्या बनवून फ्रीजमध्ये ठेवतात. भाज्या पुन्हा पुन्हा गरम करुन खाल्ल्यानंतर किंवा शिळे झाल्यानंतर त्यात असणारे नायट्रेट्स नायट्रोसामाइन्स संयुगे शरीरासाठी खराब आहेत. यामुळे पचनाशी संबंधित समस्यांसह इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.
2. उकडलेले बटाटे
बरेचदा अनेकजण एकाच वेळी भरपूर बटाटे उकळवतात आणि अनेक दिवस ते वापरतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यावेळी उकळवलेले बटाटे जास्त काळ साठवले जातात, तेव्हा त्यात असणारे संयुगे खराब होऊन बॅक्टेरिया वाढवतात. जर आपण जास्त काळ शिळे उकडलेले बटाटे खाल्ले तर आरोग्य बिघडू शकते.
3. शिळे दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ लवकर खराब होतात. त्यासाठी खाताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही या पदार्थांना बराच वेळ साठवले तर त्याची चव बदलते. हे दुग्धजन्य पदार्थ आंबट लागत असतील तर खाऊ नका. खराब झालेले दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे, मळमळ, गॅस आणि अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.
4. शिळा भात
अनेकांना फोडणीचा भात खाण्याची सवय असते. रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी देऊन त्याला चविष्ट बनवून खातात. परंतु, यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर आरोग्याला हानी होऊ शकते. भातामध्ये असे बॅक्टेरिया असतात जे शिजवल्यानंतर नष्ट होतात. यामुळे पोटबिघडण्याची शक्यता असते.