सध्याच्या धावपळीच्या आणि सतत बदलत जाणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये, चुकीच्या खाण्याच्या सवयी, कमी शारीरिक हालचाल आणि वाढता ताण यामुळे हाय कोलेस्टेरॉलची समस्या फार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल सुरुवातीला जाणवत नसले तरी पुढे जाऊन हृदयविकार, ब्लॉकेज आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकते. त्यामुळे वेळेतच आहार आणि लाईफस्टाईलमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे ठरते. आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच, फॅट्सचे प्रमाण वाढले तर असे फॅट्स हळूहळू आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन ब्लॉकेज, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अॅटॅक सारख्या गंभीर समस्यांना निमंत्रण देऊ शकते( foods to control bad cholesterol naturally).
हाय कोलेस्टेरॉल ही केवळ ज्येष्ठांची समस्या राहिलेली नसून, तरुणांमध्येही याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. व्यायामासोबतच तुमचा आहार कोलेस्टेरॉल मॅनेजमेंटमध्ये ७०% भूमिका बजावतो. यासाठीच, आपल्या स्वयंपाकघरातील साध्या डाळी आणि काही विशिष्ट पदार्थांमध्ये इतकी ताकद असते की ते, कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. फायबर, प्रोटीन आणि आवश्यक पोषक घटकांनीयुक्त असे हे पदार्थ हृदयाचे आरोग्य सुधारण्यासही उपयुक्त ठरतात, सोबतच कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासही फायदेशीर असतात. विशेषतः फायबरयुक्त डाळी आणि नैसर्गिक पदार्थ रक्तातील कोलेस्टेरॉल (best pulses for high cholesterol) शोषून घेण्यास मदत करतात. रोजच्या आहारातील काही डाळी आणि पौष्टिक पदार्थ नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. नसांमध्ये साचलेली घाण साफ करण्यासाठी आहारात कोणते बदल करणे गरजेचे आहे आणि ते कोणते 'सुपरफूड्स' आहेत ते पाहूयात...
हाय कोलेस्टेरॉलकमी करण्यास कोणत्या डाळी खाणे फायदेशीर...
जयपूर येथील 'Angelcare-A Nutrition and Wellness Center' च्या संचालिका, डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट अर्चना जैन यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत, हाय कोलेस्टेरॉल असल्यास कोणत्या डाळी खाणे फायदेशीर ठरते या विषयावर अधिक माहिती दिली आहे. डायटिशियन अर्चना जैन यांच्या मते, रोजच्या आहारात बीन्स, चणे, मटार आणि मसूर यांसारख्या डाळींचा समावेश केल्याने बॅड कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या कमी करता येते. या डाळी केवळ पौष्टिकच नाहीत, तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानल्या जातात.
१. राजमा :- राजमा हा सोल्युबल फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. हे फायबर आतड्यांमध्ये जाऊन चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल शरीराबाहेर काढण्यास मदत करते. नियमितपणे राजमा खाल्ल्याने रक्तातील LDL (बॅड कोलेस्टेरॉल) च्या पातळीत घट दिसून येते. डायटिशियन अर्चना जैन सांगतात की, आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा राजमा आपल्या आहारात समाविष्ट करावा. राजम्याचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी तो कमी तेल आणि कमी मीठ वापरून शिजवावा. राजम्यामध्ये फक्त फायबरच नाही, तर प्रथिने, लोह आणि मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
रात्री-अपरात्री लागणारी भूक आता वाढवणार नाही वजन! मध्यरात्री खायचेच तर बिंधास्त खा ‘हे’ पदार्थ...
२. काबुली चणे :- काबुली चणे किंवा छोले हे 'हाय फायबर' आणि 'प्लांट-बेस्ड प्रोटीन'चा एक उत्तम स्रोत आहेत. यामध्ये असलेले विद्राव्य फायबर (Soluble Fiber) रक्तातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. डायटिशियन अर्चना जैन यांच्या मते, उकडलेले काबुली चणे किंवा या चण्यांची कोशिंबीर करुन त्याचा आहारात समावेश नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात केला जाऊ शकतो. उकडलेले कबुली चणे खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अनहेल्दी स्नॅक्स खाण्याची सवय कमी होते. चण्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
किती दिवस उशीरा आली मासिक पाळी तर 'नॉर्मल' समजायचे? पाळी नियमित येण्यासाठी करा ३ गोष्टी...
३. हिरवेगार मटार दाणे :- हिरव्या मटारमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन 'के' सोबतच इतर महत्त्वाची पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. आणि हे खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यासोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. डायटिशियन अर्चना जैन यांच्या मते, मटारचा समावेश भाजी, सूप किंवा कोशिंबीर या स्वरूपात रोजच्या आहारात केला जाऊ शकतो. मटारमध्ये असलेले 'फायटोन्यूट्रिएंट्स' रक्तवाहिन्यांमध्ये (धमन्यांमध्ये) जमा झालेली चरबी कमी करण्यास मदत करतात. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात असणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि मटार वेटलॉस करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतो.
४. मसूर डाळ :- मसूर डाळ ही खाण्यास हलकी आणि लवकर पचणारी असते, पण तिचे फायदे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. यामध्ये फायबर आणि फोलेट चांगल्या प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. डायटिशियन अर्चना जैन यांच्या मते, मसूर डाळीचा आहारात नियमित समावेश केल्यास LDL (खराब कोलेस्टेरॉल) कमी होण्यास आणि HDL (चांगले कोलेस्टेरॉल) संतुलित राहण्यास मदत होते. मसूर डाळ रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
एका संशोधनानुसार, दररोज सुमारे १३० ग्रॅम (साधारण एक वाटी) राजमा, काबुली चणे, मटार आणि मसूर यांसारख्या डाळींचा आहारात समावेश केल्याने खराब कोलेस्टेरॉल (LDL) मध्ये ५% पर्यंत घट होऊ शकते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हा एक सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. डाळींमध्ये असलेले हाय फायबर (High Fiber) आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Low Glycemic Index) कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहारात डाळींचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
Web Summary : Manage cholesterol with pulses like kidney beans, chickpeas, peas, and lentils. High in fiber, they lower bad cholesterol, promote heart health, and aid weight management. A daily serving can significantly reduce LDL levels.
Web Summary : राजमा, चना, मटर, मसूर जैसी दालों से कोलेस्ट्रॉल नियंत्रित करें। फाइबर से भरपूर ये दालें खराब कोलेस्ट्रॉल कम करती हैं, हृदय को स्वस्थ रखती हैं, और वजन घटाने में मदद करती हैं। रोजाना सेवन से LDL का स्तर कम होता है।