Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > साखरेपेक्षाही घातक आहे 'हा' पदार्थ! हृदयविकार, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरचा वाढवतो धोका 

साखरेपेक्षाही घातक आहे 'हा' पदार्थ! हृदयविकार, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरचा वाढवतो धोका 

Health Tips: तब्येत चांगली ठेवण्यासाठी साखर सोडत असाल आणि 'हे' पदार्थ मात्र भरपूर खात असाल तर तब्येत बिघडणारच..(food that increases the risk of cancer)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 16:56 IST2025-07-15T16:56:01+5:302025-07-15T16:56:55+5:30

Health Tips: तब्येत चांगली ठेवण्यासाठी साखर सोडत असाल आणि 'हे' पदार्थ मात्र भरपूर खात असाल तर तब्येत बिघडणारच..(food that increases the risk of cancer)

food which is very dangerous, harmful for health and heart, food that increases the risk of cancer  | साखरेपेक्षाही घातक आहे 'हा' पदार्थ! हृदयविकार, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरचा वाढवतो धोका 

साखरेपेक्षाही घातक आहे 'हा' पदार्थ! हृदयविकार, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरचा वाढवतो धोका 

Highlightsकाही पदार्थ तुम्ही जर सर्रास खात असाल तर त्यामुळे तुमची तब्येत बिघडण्याचा जास्त धोका आहे.

हल्ली बरेच जण आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरुक झालेले आहेत. डाएटीशियनचा सल्ला घेऊन कोणते पदार्थ खायला हवे, कोणते टाळायला हवे याची माहिती अनेक जण घेतात आणि त्यानुसार त्यांचा आहार ठरवतात. पण बहुतांश लोक असेही आहेत जे केवळ ऐकीव माहितीवरुनच काय खायचं, काय नाही खायचं हे ठरवतात. अशा लोकांमध्ये एक कॉमन गोष्ट दिसून येते आणि ती म्हणजे वजन कमी करायचं असेल किंवा इतर कोणते आजार टाळायचे असतील तर साखर खाणं बंद करावं. म्हणून ते साखर आणि इतर गोड पदार्थ खाणं टाळतात. हे आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच चांगलं आहे. पण तज्ज्ञ असंही सांगत आहेत की साखरेपेक्षाही घातक असणारे काही पदार्थ तुम्ही जर सर्रास खात असाल तर त्यामुळे तुमची तब्येत बिघडण्याचा जास्त धोका आहे (food that increases the risk of cancer). ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा..(food which is very dangerous, harmful for health and heart)

 

तुम्हीही हे पदार्थ खाता का?

हार्वर्ड युनिव्हर्सिटी यांच्यावतीने करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की जे लोक आठवड्यातून ३ ते ४ वेळा तळलेले पदार्थ खातात त्यांच्यामध्ये हृदयरोग आणि टाईप २ मधुमेह होण्याचा धाेका ५० टक्क्यांनी वाढलेला दिसतो.

श्रावणानिमित्त बाजारात आले कमी वजनाच्या चांदीच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स! बघून सांगा कोणतं आवडलं?

त्याचप्रमाणे अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्युट्रिशन यांच्या रिपोर्टनुसार तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि ॲक्रिलामाईडसारखे कॅन्सरजन्य घटक असतात. त्यामुळे स्तनाचा कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोकाही कैकपटींनी वाढतो. उकळलेलं तेल थंड झाल्यानंतर पुन्हा ते उकळवणे आणि त्यात तळलेला पदार्थ खाणे हे तर तब्येतीसाठी खूप जास्त हानिकारक आहे. 

 

या पदार्थांमध्ये असणारं ट्रान्सफॅट आणि हायड्रोजनेटेड तेल थेट रक्तवाहिन्यांच्या कार्यातच अडथळा निर्माण करतं. त्यामुळे असे पदार्थ वारंवार खाणं हृदयासाठीही खूप हानिकारक ठरतं.

लंचनंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटतं? ३ टिप्स- झोप जाईल पळून, वाटेल फ्रेश

तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरावरील सूज आणि ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस वाढतो. या गोष्टी कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे तब्येत चांगली ठेवण्यासाठी फक्त साखर सोडून उपयोग नाही. त्यासोबतच आपण तळलेले पदार्थ किती प्रमाणात खात आहेत, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.  
 

Web Title: food which is very dangerous, harmful for health and heart, food that increases the risk of cancer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.