आजकाल वारंवार जंकफूड खाण्याची सवय, स्ट्रेस, आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि घाण साचते. ही घाण हळूहळू ब्लॉकेज निर्माण करते आणि हृदयविकारासारख्या अनेक गंभीर आणि मोठ्या आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे नसांना स्वच्छ आणि लवचिक ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश करणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्टेरॉल, फॅट्स आणि कॅल्शियम यांचा थर नसांच्या आत जमा होतो, ज्यामुळे रक्तप्रवाहाचा मार्ग अरुंद होतो. जेव्हा आपला आहार चुकीचा असतो किंवा शरीराची पुरेशी शारीरिक हालचाल होत नाही, तेव्हा शरीरातील नसांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ लागते(Food For Blocked Arteries).
या ब्लॉकेजमुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. हळूहळू चरबी व घाण नसांमध्ये साचते आणि रक्त व्यवस्थित शरीरात फिरत नाही. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण योग्य प्रमाणात पोहोचत नाही. परिणामी थकवा, हात-पायात वेदना, आणि हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो. या संदर्भात फिजिशियन डॉ. शालिनी सिंह - साळुंखे यांनी सांगितले की, काही नैसर्गिक आणि सुपरफूड्सचा आहारात समावेश केल्याने नसांमध्ये साचलेली घाण सहज दूर करता येते. हे पदार्थ आहारात घेतल्याने रक्त शुद्ध ठेवतात आणि ब्लॉकेजची समस्या देखील दूर करतात. सुदैवाने, आपल्या आहारातील काही खास पदार्थ या नसांमधील घाणीला साफ करण्यासाठी आणि नसांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी खूप मदत करतात. रक्तप्रवाह सुरळीत ठेवून, नसांच्या ब्लॉकेजचा धोका (Foods To Clean Arteries Naturally) कमी करण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात कोणते पदार्थ असणे आवश्यक आहे, हे पाहूयात.
नसांमध्ये साचलेली घाण काढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ?
१. ओट्स :- ओट्समध्ये असलेले बीटा-ग्लुकॉन फायबर कोलेस्ट्रॉलला बाहेर काढते आणि नसांमध्ये जमा होऊ देत नाही. रोज तीन-चतुर्थांश कप ओट्स आपण खाऊ शकता.
२. शेवगा :- शेवग्यामध्ये असलेले पॉलीफेनॉल्स नसांना आराम देतात आणि रक्तदाब कमी करतात. १ ते २ ग्रॅम शेवग्याच्या पानांची पावडर किंवा रोज शेवग्याची शेंग खाल्ल्याने नसांमधील ब्लॉकेज कमी होण्यास मदत होते.
३. अक्रोड :- अक्रोडमध्ये ओमेगा- ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन 'ई' चे गुणधर्म असतात, जे शरीरातील नसांन अधिक बळकट व मजबूत करतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, रोज ४ ते ५ अक्रोड आपण दिवसभरात खाऊ शकता.
४. मेथी दाणे :- मेथी दाणे हे नसांमधील साचलेले कोलेस्टेरॉल शोषून घेण्यास मदत करतात. रोज रात्री भिजवलेले ५ ग्रॅम मेथी दाणे आपण रोज खाऊ शकता.
५. कडीपत्ता :- कडीपत्त्याची पाने लिपीड ऑक्सीडेशन कमी करते आणि नसांना दुरुस्त करते. आपण रोज १० ते १२ ताजी कडीपत्त्याची पाने खाऊ शकता.
६. लसूण :- लसूण नसा साफ करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय मानला जातो. यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि एलिसिन नावाचा घटक असतो, जो रक्त पातळ ठेवून ब्लॉकेजचा धोका कमी करतो.
नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यांवर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
१. नसा बंद असल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची वेळ येऊ शकते.
२. श्वास फुलू लागतो व दम लागतो.
३. हाता - पायात वेदना होतात.
४. छातीत दुखते.
५. अचनाकपणे स्ट्रोक येऊ शकतो.
आत्तापर्यंत तुम्ही चुकीच्या पद्धतीने खात आहात पालेभाज्या! भरपूर पोषण हवं तर ‘अशी’ खा पालेभाजी...
६. पेरिफेरल आर्टरी डिसीज (Peripheral Artery Disease) होण्याची शक्यता वाढते.
७. पायात आकडी येणे, वेदना होणे आणि सुन्नपणा जाणवणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे ब्लॉकेज पायांमध्येही असू शकते, जे कमी केल्यास आपल्याला आराम मिळू शकतो.
८. गुप्तांगात रक्तप्रवाह नीट न पोहोचल्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या येऊ शकते.
९. चक्कर येऊ शकते आणि सतत थकवा जाणवतो.
