Join us

कमोडचं झाकण उघडं ठेवून फ्लश करणं भयंकर धोक्याचं, पाहा का बिघडतात लोकांच्या तब्येती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2025 17:17 IST

Flushing the toilet with the lid open is extremely dangerous, health tips, read and learn : फ्लश करताना झाकण उघडे ठेवता ? पाहा लहान चूक ठरेल फार धोकादायक.

आजकाल जवळपास सगळीकडेच कमोड सिस्टीम पाहायला मिळते. भारतीय पद्धतीचे टॉयलेट असते आणि बाजूला कमोडही असतो. काही वर्षांपूर्वी मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा काही ठराविक ठिकाणी राहणार्‍या लोकांकडे ही पद्धत पाहायला मिळायची. (Flushing the toilet with the lid open is extremely dangerous, health tips, read and learn)वेस्टर्न स्टाईल टॉयलेट किंवा कमोड असे याला म्हटले जाते. मात्र आता गावोगावी आणि घरोघरी असे टॉयलेट पाहायला मिळतात. मध्यंतरी सार्वजनिक ठिकाणी कमोड वापरु नये हा विषय फार चर्चेत होता. फक्त एवढेच नाही तर आरोग्यासाठी भारतीय पद्धतीचे प्रसाधनगृह म्हणजे टॉयलेट वापरणे फायद्याचे ठरते असा विषयही व्हायरल झाला होता. मात्र कमोड बद्दल आणखी एक शोध सगळ्यांना थक्क करणारा आहे. कमोड वापरत असाल तर पहिले हे वाचाच.      

शास्त्रज्ञांनी असे सांगितले की झाकण उघडे ठेवून टॉयलेट फ्लश केल्याने टॉयलेट प्लूम निर्माण होते. टॉयलेट प्लूम म्हणजे काय? तर लघवी आणि विष्ठेतील अत्यंत सूक्ष्म बॅक्टेरिया तसेच विषाणू आणि रोगकारक कण हवेत मिसळतात. फ्लश केल्यावर हे डोळ्याला न दिसणारे कण हवेत मिसळतात आणि सगळीकडे पसरतात. 

कोलोरॅडो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात आणि इतरही काही अभ्यासांत असे आढळले आहे की, फ्लश करताना पाण्याचा जो गोलाकार प्रवाह तयार होतो त्यामुळे हे कण ६ फूटांपर्यंत हवेत उडतात.त्यानंतर काही मिनिटांपर्यंत हवेत तरंगत राहतात. यामुळे हे कण टूथब्रश, टॉवेल्स आणि काउंटरटॉपसारख्या पृष्ठभागांवर साचू शकतात.

या प्लूममध्ये इ.कोली आणि नोरोव्हायरस सारखे रोगकारक घटक आढळतात असा तज्ज्ञांचा दावा आहे. हे घटक आपल्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरू शकतात.  विशेषतः जेव्हा बाथरूममध्ये योग्य वायुवीजन(exhaust system) नसते तेव्हा हे कण तिथेच फिरत राहतात. 

त्यामुळे फ्लश करताना झाकण बंद करणे फार गरजेचे आहे. झाकण बंद केल्यामुळे ही प्रक्रिया जवळपास ५०टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. असे फिजिक्स ऑफ फ्लड्स या शास्त्रीय जर्नलमध्ये २०२१ साली प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात स्पष्ट केले आहे. कमोड वारत असाल तर ही माहिती असणे फार गरजेचे आहे. 

आरोग्य आणि स्वच्छतेविषयीचा हा विषय असल्याने प्रत्यक्ष संसर्गाचा धोका किती आहे? हे ठरवण्यासाठी अधिक तपशीलवार माहितीची गरज आहे. त्यामुळे त्यावर संशोधन सुरु आहे. कारण प्रत्येक बाथरूममधील वापराचे स्वरूप आणि स्वच्छतेच्या सवयी यावर तो धोका अवलंबून असतो. असेही अभ्यासात सांगितले आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससोशल व्हायरल