दातांच्या सौंदर्यावर आणि आरोग्यावर परिणाम करणाऱ्या समस्यांमध्ये पिवळेपणा, दुर्गंधी, दातांची झीज व सेंसिटिव्हिटी अशा अनेक त्रासांचा समावेश होतो. या सगळ्या समस्या चुकीच्या (Fitkari & Salt For Yellow Teeth Whitening Home Remedies) खाण्यापिण्याच्या सवयी, तोंडाची योग्य काळजी न घेणे, चहा–कॉफीचे जास्त प्रमाण, तसेच धूम्रपान किंवा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे निर्माण होतात. या सगळ्या कारणांमुळे दातांवर पिवळसर (Fitkari For Yellow Teeth Whitening) थर जमा होतो, याशिवाय (How to remove yellow spots from your teeth) दातांमध्ये दुर्गंधी, सेंसिटिव्हिटी, किड लागणे अशा अनेक समस्या कायम सतावतात. या सर्व समस्यांवर बाजारातील महागडी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरगुती सोपे उपाय अधिक परिणामकारक ठरू शकतात(What is the best home remedy for yellow teeth).
या घरगुती उपायांमध्ये 'तुरटी' हा असा एक नैसर्गिक घटक आहे, जो दातांच्या अनेक समस्या कमी करून ओरल हेल्थची योग्य काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरतो. तुरटीसोबतच घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही औषधी पदार्थांच्या मदतीने आपण संपूर्ण ओरल हेल्थची काळजी घेऊ शकतो. glowuptipswithme_या इंस्टाग्राम अकाउंटवरुन डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी, दातांच्या आणि एकूणच ओरल हेल्थच्या समस्या कमी करण्यासाठी कोणता खास उपाय शेअर केला आहे ते पाहूयात.
साहित्य :-
१. तुरटी - ५० ग्रॅम
२. सैंधव मीठ - ५० ग्रॅम
३. लवंग - १० ग्रॅम
४. मोहरीचे तेल - २ टेबलस्पून
कृती :-
सगळ्यातआधी एका मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात तुरटीचा खडा, सैंधव मीठ, लवंग असे तिन्ही पदार्थ एकत्रित घेऊन त्याची बारीक पूड करून घ्यावी. या मिश्रणाची ही तयार बारीक पूड एका हवाबंद डब्यांत भरून स्टोअर करून ठेवावी.
पालथं झोपण्याची सवय घातक, ठरु शकते हृदयविकाराचेही कारण- डॉक्टर सांगतात झोपण्याची योग्य पद्धत...
याचा वापर कसा करावा ?
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर चमचाभर ही बारीक पूड घेऊन त्यात थोडे मोहरीचे तेल मिसळून घ्यावे. हे मिश्रण एकत्रित कालवून ब्रशच्या मदतीने दातांवर लावून ब्रश करून घ्यावे. टूथपेस्ट ऐवजी आपण या मिश्रणाचा दररोज वापर करु शकता.
थायरॉईडमुळे गळ्याला सूज आली? पोषणतज्ज्ञांचा सल्ला- २ गोष्टी करा, काळजी नको उपाय करा...
हा उपाय करण्याचे फायदे...
१. तुरटी :- तुरटीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात व दातांवरील पिवळसर थर कमी होतो.
२. सैंधव मीठ :- सैंधव मीठ हे दात आणि हिरड्यांसाठी उत्तम नैसर्गिक स्क्रबर आहे. हे दातांवरील डाग आणि पिवळेपणा दूर करण्यास मदत करतात. तसेच हिरड्यांमधील इन्फेक्शन आणि सूज कमी करण्यास उपयुक्त ठरते.
३. लवंग :- लवंगमध्ये असलेले युजेनॉल हे दातदुखीवर रामबाण उपाय मानले जाते. हे दातातील वेदना, सेंसिटिव्हिटी आणि दुर्गंधी दूर करते.
४. मोहरीचे तेल :- मोहरीचे तेल दात आणि हिरड्यांना मजबूती देते. याने मसाज केल्यास हिरड्यांतील रक्ताभिसरण सुधारते आणि दातांवर जमा झालेला मळ दूर होते. यामुळे दात चमकदार होतात आणि तोंडातील दुर्गंधी नष्ट होते.