Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात गारठ्याने तळपाय थंड पडून ठणकतात? ६ टिप्स, काम होईल भरभर - दुखणे बंद...

हिवाळ्यात गारठ्याने तळपाय थंड पडून ठणकतात? ६ टिप्स, काम होईल भरभर - दुखणे बंद...

Feet get Cold in Winter 6 Remedies will help : hands & feet are always cold in the winter, even with socks & gloves. What do to : 6 Hacks to Keep Your Feet Warm In Winter : हिवाळ्यात हात-पाय गार पडणे हा त्रास अनेकांना होतो, यावर उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 15:45 IST2025-01-13T15:34:06+5:302025-01-13T15:45:45+5:30

Feet get Cold in Winter 6 Remedies will help : hands & feet are always cold in the winter, even with socks & gloves. What do to : 6 Hacks to Keep Your Feet Warm In Winter : हिवाळ्यात हात-पाय गार पडणे हा त्रास अनेकांना होतो, यावर उपाय काय?

Feet get Cold in Winter 6 Remedies will help 6 Hacks to Keep Your Feet Warm In Winter | हिवाळ्यात गारठ्याने तळपाय थंड पडून ठणकतात? ६ टिप्स, काम होईल भरभर - दुखणे बंद...

हिवाळ्यात गारठ्याने तळपाय थंड पडून ठणकतात? ६ टिप्स, काम होईल भरभर - दुखणे बंद...

'हिवाळा' सगळ्यांच्याच आवडीचा ऋतू असला तरीही या ऋतूत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसात त्वचा कोरडी, निस्तेज, काळपट पडते, सोबतच केसांच्या अनेक समस्या (Feet get Cold in Winter 6 Remedies will help) देखील उद्भवतात. एवढंच नाही तर हिवाळ्यात गारठयाने हात - पाय प्रचंड गार पडतात. थंडीच्या दिवसांत हात - पाय थंड (hands & feet are always cold in the winter, even with socks & gloves. What do to) पडण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना सतावते. हिवाळ्यात बाहेरील वातावरणातील गारठा वाढला की ही समस्या खूप त्रास देते. अशावेळी आपण थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हातात हातमोजे तर पायात सॉक्स घालतो. परंतु कित्येकदा असे हातमोजे किंवा पायमोजे घालूनही त्याचा काहीच फायदा होत नाही(6 Hacks to Keep Your Feet Warm In Winter).

काहीवेळा ही लहान वाटणारी समस्या इतकी तीव्र आणि गंभीर होते की, मोजे घालून देखील त्रास कमी होत नाही. अशा परिस्थितीत, रात्री झोपताना पायांवर जाडजूड चादरी - ब्लँकेट घेऊन देखील थंडीमुळे पाय आणि तळवे थंड पडतात. यामुळे रात्रीची झोप देखील व्यवस्थित होत नाही. अशाप्रकारे पाय आणि तळवे थंड पडण्याची अनेक कारण असू शकतात. रक्ताभिसरणाची कमतरता, शरीरात लोहाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता इ. अशी अनेक कारण असू शकतात. या समस्येवर आपण काही घरगुती उपचार देखील नक्की करून पाहू शकता. हे उपाय केवळ तळवे उबदार ठेवत नाहीत तर तुम्ही रात्रभर शांत आणि आरामदायी झोप घेऊ शकता.

हिवाळ्यात हात - पाय उबदार कसे ठेवावेत? 

१. हात - पाय गरम पाण्याने धुवा :- थंड पायांना उबदारपणा येण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण गरम पाण्याचा वापर करु शकतो. गरम पाण्यात मीठ घाला आणि हात - पाय त्यात काही वेळासाठी बुडवून ठेवा. हात - पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्याने हातापायांमधील ब्लड सर्कुलेशन योग्यरित्या होते. सोबतच हाता पायांना चांगला शेक देखील मिळतो. 

२. गरम पाण्याची बाटली सोबत ठेवा :- रात्री झोपताना कोमट पाण्याने भरलेली बाटली चादर किंवा ब्लँकेटमध्ये पायाजवळ ठेवा. यामुळे हातापायांना उबदारपणा येण्यास मदत होईल आणि तुमचे हात - पाय दीर्घकाळ उबदार राहतील.

पांढराशुभ्र चार्जर मळून काळाकुट्ट झाला? ४ ट्रिक्स, मळका चार्जर दिसेल नव्यासारखा स्वच्छ...

३. हातापायांवर शाल गुंडाळा :- जर तुमचे हात - पाय वारंवार थंड पडत असतील तर तुमचे हात - पाय लोकरीच्या शालीत गुंडाळा किंवा जाड मोजे घाला. शाल पांघरल्याने तळव्यांची उष्णता बाहेर जाणार नाही आणि तुम्हाला आराम वाटेल. तुम्ही मोजे घातले असल्यास ते सैल आणि आरामदायी असल्याची खात्री करा.     

४. गरम तेलाने मसाज :- हातापायांना उबदार ठेवण्यासाठी तेल फायदेशीर ठरेल. या नैसर्गिक उपचाराने पायांना आराम मिळेल. पायांना गरम तेलाने मालिश करा. यासाठी आपण मोहरी किंवा ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. सर्वप्रथम तळहातावर तेलाचे काही थेंब घेऊन तळवे आणि संपूर्ण पायांचा मसाज करा. यामुळे रक्त प्रवाह वाढेल, ज्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुधारेल. अशा प्रकारे पाय उबदार राहतील.

थंडीत कुडकुडत टू व्हीलर चालवणं अवघड, करा २ गोष्टी-थंडी अजिबात वाजणार नाही...

मोबाईल हातात घेऊन तासंतास रिल्स पाहण्यात घालवत टाइमपास करता? सवय तोडायचीय, घ्या या भन्नाट ट्रिक्स...

५. हीटिंग पॅड वापरा :- हिवाळ्यात जर पायांचे तळवे थंडगार पडत असतील तर हीटिंग पॅडचा वापर करा. हीटिंग पॅड हा उत्तम पर्याय आहे. पायाखाली किंवा तळव्याजवळ हीटिंग पॅड ठेवा. यामुळे तळव्यांना उष्णता मिळेल आणि तुम्हाला आरामदायक वाटेल.

६. हलका व्यायाम करा :- झोपण्यापूर्वी काही मिनिटे हलका व्यायाम करा, जसे की तुमचे पाय हलवणे किंवा स्ट्रेच करणे इ. यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि तळव्यांना उबदारपणा येईल. 

या घरगुती उपायांचा वापर केल्याने तुम्ही थंडीच्या रात्रीत तळपाय  थंड पडण्याच्या समस्येपासून आराम मिळवू शकता आणि आरामात झोपू शकता.

Web Title: Feet get Cold in Winter 6 Remedies will help 6 Hacks to Keep Your Feet Warm In Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.