थोडसं चालल्यावरही पाय सुजणे आणि पावले दुखणे ही एक सामान्य पण समस्या आहे. एखाद्या वयस्कर व्यक्तीला असा त्रास होणं अगदी सहाजिक आहे. तसेच जास्त वेळ उभं राहून काम करणाऱ्यांना असा त्रास होतो. ( Feet are swollen? is it very painful? This problem arises due to our own mistakes, see what to change..)वजन जास्त असल्यावर पायांवर त्याचा जास्त ताण येतो, त्यामुळे पाय दुखतात. ही सामान्य कारणे आहेतच मात्र अशा प्रकारची सूज आणि वेदना अनेक वेळा शरीरातील काही लपलेल्या कारणांमुळे उद्भवू शकतात आणि ती दुर्लक्षित राहिल्यास ती पुढे गंभीर होऊ शकतात.
पाय सुजण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे रक्ताभिसरण व्यवस्थित न होणे. जेव्हा शरीरातील रक्त योग्य प्रकारे हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा रक्त साठते त्यामुळे पायाजवळ लाल चट्टेही उठतात. रक्ताभिसरण सुरळीत नसेल तर सूज येते. याला वैद्यकीय भाषेत 'Edema' असे म्हणतात. अनेक वेळा हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड झाल्यावर शरीरात पाणी साचण्याची प्रवृत्ती वाढते. अशा वेळी पायांचे दुखणे, जड वाटणे, सुजणे अशी लक्षणे दिसून येतात.
मुख्य कारण म्हणजे वजन. संपूर्ण शरीराचा भार पांयावरच येतो. त्यामुळे टाचा, पायाचे तळवे दुखायला लागतात. अर्थात अयोग्य चपला वापरणे, सपाट तळव्याच्या चपला किंवा खूप उंच हिल्स यामुळे पावले योग्य प्रकारे आधार घेत नाहीत आणि त्यामुळे दुखणं वाढतं.
थायरॉईडचा त्रास, हायपोथायरॉईडिझम असे काही त्रास पाय सूजण्यामागील कारणं ठरू शकतात. तसेच, दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्यास किंवा सतत उभे राहिल्यास, स्नायूंवर ताण येतो आणि त्यामुळे सूज येते आणि पाय दुखतात. अनेक स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर हार्मोन्समुळे पाय सुजण्याची समस्या दिसून येते. गरोदरपणात सुद्धा वजन वाढ, हार्मोनल बदल व रक्तदाबात होणारे चढउतार यामुळे पाय सुजतात.
शेक घेणे, औषधे घेणे असे सारे उपाय करताच येतात. अनेक उपाय आहेत मात्र एक अगदी प्रभावी आणि सोपा उपाय म्हणजे पाय उंच करुन झोपणे. भिंतीचा आधार घ्यायचा आणि पाय सरळ वरच्या दिशेने करुन झोपायचे. असे केल्यामुळे पायाचे अनेक त्रास बरे होतात. योग्य विश्रांती घेणे फार गरजेचे असते.