Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी झोप येते आणि रात्री डोळे टक्क उघडे ? अजिबात दुर्लक्ष करु नका, जाणून घ्या असे का होते..

सकाळी झोप येते आणि रात्री डोळे टक्क उघडे ? अजिबात दुर्लक्ष करु नका, जाणून घ्या असे का होते..

Feeling sleepy in the morning and wide-open eyes at night? health tips : रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो तर पाहा काय त्रास आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 14:11 IST2025-09-15T14:10:03+5:302025-09-15T14:11:05+5:30

Feeling sleepy in the morning and wide-open eyes at night? health tips : रात्री झोप लागत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो तर पाहा काय त्रास आहे.

Feeling sleepy in the morning and wide-open eyes at night? health tips | सकाळी झोप येते आणि रात्री डोळे टक्क उघडे ? अजिबात दुर्लक्ष करु नका, जाणून घ्या असे का होते..

सकाळी झोप येते आणि रात्री डोळे टक्क उघडे ? अजिबात दुर्लक्ष करु नका, जाणून घ्या असे का होते..

आजकालची बदललेली जीवनशैली झोपेच्या चक्रावर फार वाईट परिणाम करते आहे.  दिवसा झोप येणे आणि रात्री झोप न लागणे हा केवळ सवयींचा प्रश्न नसून शरीरातील काही बदल, पोषणसत्वांची कमतरता किंवा मानसिक ताण अशा विविध कारणांमुळेही असे होऊ शकते. (Feeling sleepy in the morning and wide-open eyes at night? health tips )झोपेचे चक्र बिघडले की मग थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि कामाची क्षमता कमी होणे असे अनेक त्रास होतात. शरीरात कशाची कमतरता आहे ते जाणून घ्या. कारण नंतर त्याचा त्रास वाढू शकतो. झोपेवर परिणाम करणारी काही सामान्य कारणे आहेत. 

झोपेशी संबंधित काही त्रास असेल तर सर्वात आधी शरीरात जीवनसत्त्व 'बी१२' ची कमतरता आढळते. बी१२ शरीरात कमी झाले की मज्जासंस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि दिवसा सतत झोप येते. त्याचबरोबर लोह (Iron) कमी झाल्यास रक्तातील हीमोग्लोबिन कमी होते, ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि थकवा येऊन झोप वाढते. जीवनसत्त्व 'डी' ची कमतरता देखील मेंदूच्या कार्यावर आणि हार्मोन्सवर परिणाम होतो त्यामुळेही दिवसा काम करताना झोप येते.

याशिवाय मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचे प्रमाण कमी झाल्यास झोपेचे चक्र (sleep cycle) बिघडते. शरीरात मेलाटोनिन हार्मोन नीट तयार न झाल्यास रात्री झोप लागत नाही व दिवसा थकवा जाणवतो. झोपण्याच्या सवयी, जास्त कॅफीन,  मोबाइलचा अति वापर, मानसिक ताण, नैराश्य, थायरॉइडची समस्या किंवा स्लीप ऍपनिया यासारख्या आजारांमुळेही हे लक्षण दिसते.

यावर उपाय म्हणून संतुलित आहार घेणे, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणे, नियमित व्यायाम, झोपण्याची निश्चित वेळ ठेवणे, रात्री कॅफीन टाळणे आणि ताण कमी करण्यासाठी ध्यान-प्राणायाम करणे उपयोगी ठरते. काही दिवसांपेक्षा जास्त काळ ही समस्या टिकली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन रक्त तपासणी आणि इतरही तपासणी करुन घ्या. कारण योग्य निदान झाल्यासच योग्य पूरक आहार किंवा औषधोपचार सुरू करता येतात आणि झोपेची नैसर्गिक लय पुन्हा स्थिर करता येते.

Web Title: Feeling sleepy in the morning and wide-open eyes at night? health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.