सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही मिनिटांसाठी अंगात आळस असतो. पण त्यानंतर मात्र सलग एका स्पीडमध्ये आपलं काम सुरू असतं. एकानंतर एक कामाची यादी उरकणं सुरू असतं. अशातच दुपार होते. दुपारी आपण जेवण करतो आणि त्यानंतर आपल्या कामाचा वेग अगदी कमी होऊन जातो. काही जण तर असे असतात की जेवण झाल्यानंतर त्यांना काही वेळ अजिबातच काही सुचत नाही. डोळे जड पडायला लागतात आणि प्रचंड झोप यायला लागते. ही मंडळी घरी असतीत तर झोप घेणं शक्य आहे. पण वर्किंग असतील तर मात्र काय करावं सुचत नाही. तुम्हालाही दुपारच्या जेवणानंतर अशीच सुस्ती येते का एक्सपर्ट सांगतात पुढील काही लक्षणं दिसत असतील तर मात्र तब्येतीकडे थोडं लक्ष द्यायला हवं कारण....(feeling sleepy after lunch is normal or indication of serious health issues?)
दुपारच्या जेवणानंतर सुस्ती येणं नॉर्मल आहे का?
तज्ज्ञ असं सांगतात की दुपारी आपण भरपेट जेवण केलेलं असतं. त्यामुळे आपलं शरीर जेवण पचवायला सुरुवात करतं. यादरम्यान थोडी फार सुस्ती येत असेल आणि तुम्ही १५ मिनिटे किंवा अर्धा तास झोप काढत असाल तर ते ठीक आहे.
उन्हामुळे त्वचा खूप काळवंडून गेली? 'या' पद्धतीने राईस फेशियल करा- टॅनिंग जाऊन चेहऱ्यावर येईल ग्लो
पण जर सुस्तीमुळे तुम्हाला पुढची कामं करणं असह्य होत असेल आणि केवळ झोपच झोप होत असेल तर मात्र चुकीचा आहार हे त्यामागचं एक कारण असू शकतं. आहारात गरजेपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स असतील आणि प्रोटीन्स कमी प्रमाणात असेल तर हा त्रास होऊ शकतो.
तसेच जेवणानंतर खूपच सुस्ती येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे तुमच्या आहारात असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे जेवण होताच तुमची शुगर लेव्हल वेगाने वाढते, पण तेवढ्याच वेगात ती खाली येते.
चिरलेलं टरबूज नेहमीच खूप उरतं? 'या' पद्धतीने ज्यूस करून प्या, घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडेल
त्यामुळे एनर्जी एकदम कमी झाल्यासारखी होते, थकवा- आळस येऊन झोपावं वाटतं. त्यामुळे तुमच्या बाबतीत एकदा असं तर होत नाही ना हे एकदा तपासून पाहा. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याची गरज आहे, याबाबतीत शरीराने दिलेली ही एक सूचना असू शकते.
Web Summary : Feeling sleepy after lunch is often normal due to digestion. However, excessive sleepiness could indicate a diet high in carbs and low in protein, or rapid blood sugar fluctuations. Consult a doctor if concerned.
Web Summary : दोपहर के भोजन के बाद नींद आना पाचन के कारण सामान्य है। अत्यधिक नींद आना उच्च कार्ब और कम प्रोटीन वाले आहार या रक्त शर्करा में तेजी से उतार-चढ़ाव का संकेत हो सकता है। चिंतित होने पर डॉक्टर से सलाह लें।