Join us

चक्कर येते- डोळ्यांसमोर अंधारी- मायग्रेनचा त्रास? ४ योगासनं चुकूनही करु नका, डोकेदुखीचा वाढेल त्रास- जाणवेल थकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 17:35 IST

Migraine yoga warning: Yoga to avoid in migraine: Migraine triggers: चुकीची योगासनं केल्यास आपल्याला गरगरु लागते. त्यामुळे मायग्रेन असणाऱ्यांनी ४ योगासनं चुकूनही करु नका.

आई गं.. डोकं दुखू लागले की, आपल्याला काय करावे सुचत नाही. सतत डोकं ठणकत राहत. (Migraine issue) कितीही औषधं घेतली तरी त्याचा फारसा काही परिणाम आपल्यावर होत नाही. अनेकदा ही डोकेदुखी थांबवण्यासाठी आपण चहा आणि कॉफीचे घोट घेत राहतो.(Migraine yoga warning) वारंवार दुखणाऱ्या डोकेदुखीकडे आपण सरार्स दुर्लक्ष करतो पण याचे रुपातंर मायग्रेनमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. (Yoga to avoid in migraine) मायग्रेन ही डोकेदुखीची तीव्र समस्या असून यामध्ये डोक्याच्या दोन्ही बाजूंना जडपणा जाणवतो. ही डोकेदुखी काही वेळेसाठी नसून २ ते ३ दिवस कायमस्वरुपी राहते.(Migraine yoga tips) या काळात प्रकाश, आवाज किंवा वास देखील आपल्याला सहन होत नाही.(Headache relief tips) कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्तीच्या पलिकडे जाते. आणि याचा संपूर्ण परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. अतिप्रमाणात विचार, पुरेशी झोप न घेणे, डोळ्यांवर सतत येणारा ताण, थकवा आणि वाढती चिंता यामुळे मायग्रेनचा आजर आपल्याला जडतो. अशावेळी डॉक्टर आपल्या औषधेपचार घेण्यास सांगतात.(Yoga and migraine care) अनेकदा आपल्याला ध्यान, मेडिटेशन करायला देखील सांगतात. पुरेसा आहार आणि योग्य व्यायामही महत्त्वाचा असतो. परंतु चुकीची योगासनं केल्यास आपल्याला गरगरु लागते. त्यामुळे मायग्रेन असणाऱ्यांनी ४ योगासनं चुकूनही करु नका.(Health tips for migraine sufferers) 

पावसाळ्यात साचलेल्या घाण पाण्यात जपून चाला, पसरतोय गंभीर संसर्गजन्य आजार- जीवावर बेतेल

1. शीर्षासन 

शीर्षासनमध्ये आपले संपूर्ण शरीर उलटे होते आणि त्याचा भार आपल्या डोक्यावर येतो. ज्यामुळे डोक्याजवळ रक्तपुरवठ्याचा फ्लो वाढतो. ज्यामुळे हृदय जोरजोरात धडधडू लागते आणि डोकेदुखीसह छातीत दुखते. जर मायग्रेनचा त्रास होत असेल तर ते अजून वाढण्याची शक्यता आहे. 

2. हलासन 

हलासनमध्ये आपले दोन्ही पाय डोक्याचे मागे जाऊन जमिनीला टेकतात. यामुळे मानेच्या हाडावर जोर पडतो. मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी असा योगा करणे टाळावे. चुकीच्या योगासनामुळे मानेवर अधिक दाब पडतो ज्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. 

सर्दी-खोकल्यामुळे हैराण, नाक चोंदलं, श्वासही घेता येतं नाही? ‘हा’ काढा प्या, त्रास होईल कमी

3. सर्वांगासन 

सर्वांगासनामध्ये खांद्यावर संपूर्ण शरीराचा भार येतो. यामुळे मानेवर आणि पाठीच्या हाडावर पूर्ण दाब जाणवू लागतो. यात ब्लड सर्क्युलेशन शरीराला आणि हृदयाला पुरेशा प्रमाणात होत नाही. ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. 

4. उष्ट्रासन 

यामध्ये शरीराची स्थिती ही उंटासारखी दिसते. पाठीच्या कण्याला ताण देण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी केले जाते. यात डोके मागाच्या बाजूला गेल्यामुळे आपल्याला चक्कर येते. आपल्या सर्वाइकलवर दाब येतो. ज्यामुळ डोकेदुखीचा त्रास वाढतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स