आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा-कॉफीने होते. गरमागरम चहा आपल्याला दिवसभर फ्रेश आणि ऊर्जात्मक ठेवतो. (acidity after tea remedy) इतकेच नाही तर दुपारच्या वेळी किंवा डोकेदुखी उद्भवली की आपण चहा पितो. मित्रांच्या गप्पा-टप्पा असो किंवा बरसणाऱ्या पावसात चहाचा आस्वाद घेणं असो. (chest burning after tea solution) अनेकांसाठी चहा म्हणजे जीव की प्राणच जणू... (tea lovers acidity fix) पण अनेकदा चहा प्यायल्यानंतर तर ॲसिडीटीची समस्या वाढते. (how to avoid acidity after drinking tea) रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने किंवा जास्त चहा प्यायल्याने ॲसिडीटीची त्रास अधिक वाढतो. चहामध्ये टॅनिन आणि कॅफिनसारखे घटक असतात. जे पोटातील ॲसिडीटी वाढवू शकतात. (enjoy tea without acidity) प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ डिंपल जांगरा यांनी ॲसिडीटीची का होते? यावर उपाय कसा करायचा याविषयी सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर (monsoon healthy tea habits)
1. चहा प्यायल्यानंतर ॲसिडीटीची का होते?
चहाच्या पानांमध्ये टॅनिन असते. जे एक प्रकारचे पॉलिफेनॉल आहे. ज्यावेळी आपण चहाची पाने जास्त उकळता तेव्हा त्यातून टॅनिन बाहेर पडते. दुधात असणाऱ्या केसिन नावाच्या घटकांशी याचा संपर्क होते. जे आपल्या शरीरात आम्लयुक्त संयुग तयार करतात. ज्यामुळे छातीत जळजळ आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. जर आपण दिवसभरात ३ ते ४ कप चहा प्यायलो तर ६ ते ७ चमचे साखर खातो. यामुळे आपल्याला टाइम २ मधुमेह आणि हायपरग्लाइसेमिया वाढू शकतो.
2. ॲसिडीटीपासून सुटका कशी मिळवाल?
चहामुळे आपल्याला ॲसिडीटी होऊ शकते. पण त्यात घातले जाणारे आले, वेलची आणि दालचिनीसारखे मसाले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात तसेच यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे मसाले आपण चहामध्ये मिसळल्यास आरोग्याला फायदे होतील.
दालचिनीमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आहेत. जे मधुमेहींसाठी देखील फायदेशीर असतात. वेलची ही तोंड स्वच्छ करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. लवंगमध्ये वेदनाशामक गुणधर्म आहेत. जे दातांचे आरोग्य चांगले राखण्यास आणि पोकळी-जंत रोखण्यास मदत करते. काळीमिरीमुळे चयापचय सुधारते. आले हे मळमळ आणि अचनाची समस्या कमी करते.
3. चहा कसा बनवाल?
चहा बनवताना थोडे पाणी उकळा त्यानंतर त्यात आपल्या आवडीचे मसाले घाला. सर्व मसाले उकळल्यानंतर त्यात चहा पावडर किंवा चहाची पाने घाला. उकळून गाळून घेतल्यानंतर चहामध्ये वरुन दूध घाला. चहा करताना गोड म्हणून गूळ किंवा रॉक शुगर घालू शकतो. यामुळे जळजळ आणि ॲसिडीटीचा त्रास कमी होईल.