Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चेहरा सांगतो आरोग्याच्या तक्रारी! डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

चेहरा सांगतो आरोग्याच्या तक्रारी! डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

Facial signs of poor health: What your face says about your health: Dark circles and health problems: आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर आपल्या चेहऱ्यावर काही बदल दिसू लागतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही गंभीर लक्षणे कोणती जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2025 12:50 IST2025-05-07T12:26:58+5:302025-05-07T12:50:14+5:30

Facial signs of poor health: What your face says about your health: Dark circles and health problems: आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर आपल्या चेहऱ्यावर काही बदल दिसू लागतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही गंभीर लक्षणे कोणती जाणून घेऊया.

Face reveals health problems Dark circles- chapped lips- facial hair, symptoms of serious illness do not avoid doctor said | चेहरा सांगतो आरोग्याच्या तक्रारी! डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

चेहरा सांगतो आरोग्याच्या तक्रारी! डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

आपण आपला चेहरा रोज आरशात न्याहाळतो. अनेकदा चेहऱ्यावर आपला काही बदल पाहायला मिळतात.(Facial signs of poor health) बहुतेक लोक हे बदल समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे आरोग्याशी संबंधित प्रमुख लक्षण असू शकते. (What your face says about your health)
अनेकदा डोळ्यांखाली काळे वर्तुळे येणे, चेहरा काळा पडणे, ओठ फुटणे किंवा चेहऱ्यावर केस येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.(Dark circles and health problems) आपण याकडे टॅनिंग किंवा हार्मोन्स बदल म्हणून दुर्लक्ष करतो. परंतु, ही लक्षणे गंभीर झाल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते.(Face symptoms not to ignore) आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर आपल्या चेहऱ्यावर काही बदल दिसू लागतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही गंभीर लक्षणे कोणती जाणून घेऊया. 

अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ

डॉ. एड्रियन यांनी इंस्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली ते म्हणतात की, आपल्या चेहऱ्यावरील काही बदल आरोग्याशी संबंधित गोष्टी सांगतात. ज्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. 

1. महिलांच्या चेहऱ्यावर नको असणारे केस 

डॉक्टरांच्या मते, ज्या महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस असतात त्याचे हार्मोनल असंतुलित असते. ज्यामुळे पीसीओएस किंवा पीसीओडी सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. तसेच थायरॉईड आणि अधिवृक्क ग्रंथीमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे चेहऱ्यावर केस दिसू लागतात. 

2. आयब्रो पातळ होणे 

अनेकदा आपल्या आयब्रोवरील केस गळू लागतात किंवा भुवया पातळ होतात. असे जर वारंवार होत असेल तर आपण थॉयरॉईडची टेस्ट करायला हवी. हे हायपोथायरॉईडीझममुळे होऊ शकते. शरीरात आयोडिनची कमतरता असेल तर ही लक्षणे आपल्याला जाणवतात. 

">

3. चेहरा लालसर होणे 

कोणत्याही कारणांशिवाय लालसर होणे किंवा रॅशेस येण्याच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. हे ऍलर्जी किंवा हिस्टामाइनमुळे होऊ शकते. 

4. ओठ फुटणे 

ऋतुमानानुसार आपल्या ओठांवर परिणाम होतो. ओठ फुटणे किंवा कोरडे पडण्याची समस्या आपल्याला सतावते. हे शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्यास होते. याशिवाय बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, पाणी न प्यायल्यामुळे देखील ओठांच्या तक्रारी वाढतात. 

5. डोळ्यांखाली काळी वर्तुळे 

हार्मोनल असंतुलन, जास्त इस्ट्रोजन झाल्यास डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. तसेच शरीरात लोहाची कमतरता झाल्यास ही लक्षणे अधिक गंभीर होतात. तज्ज्ञ सांगतात या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच डॉक्टरांकडे जा. 
 

Web Title: Face reveals health problems Dark circles- chapped lips- facial hair, symptoms of serious illness do not avoid doctor said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.