Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डोळे सुजतात - चुरचुर करतात? फक्त ताण नाही तर ५ गोष्टी ठरतात कारणीभूत... पहा काय करायचे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2026 14:48 IST

Eyes swollen and burning? It’s not just stress , these 5 reasons could be behind it… what to do : डोळ्याची काळजी घ्या. पाहा का सुजतात सारखे.

डोळे सुजणे हा अनेकांना जाणवणारा सामान्य त्रास आहे. सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती सूज दिसणे, जडपणा जाणवणे किंवा डोळे लहान होणे असे अनुभव अनेकदा येतात. (Eyes swollen and burning? It’s not just stress , these 5 reasons could be behind it… what to do)हा त्रास कधी तात्पुरता असतो, तर काही वेळा तो शरीरातील इतर समस्यांचे संकेतही देऊ शकतो. त्यामुळे डोळे सुजण्याची कारणे समजून घेणे आणि योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

डोळे सुजण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे  झोपेची कमतरता. पुरेशी झोप न घेतल्यास डोळ्यांभोवती सूज येते आणि चेहरा थकलेला दिसतो. तसेच झोप जास्त झाली तरी डोळे सुजतात. दुसरे कारण म्हणजे जास्त मीठ खाणे. आहारात सोडियमचे प्रमाण वाढल्यास शरीरात पाणी साठते आणि त्याचा परिणाम डोळ्यांवर सूज स्वरुपात दिसतो.

तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ऍलर्जी. धूळ, परागकण, मेकअप किंवा काही रसायनांमुळे डोळ्यांना त्रास होऊन सूज, खाज आणि पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. चौथे कारण म्हणजे जास्त स्क्रीन टाइम. मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा जास्त वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि सूज किंवा जळजळ जाणवू शकते. त्यामुळे काम करताना ब्रेक घेणं गरजेचं आहे. 

पाचवे कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीरात संतुलन बिघडते आणि डोळ्यांभोवती सूज दिसू शकते. तसेच काही वेळा रडणे, हार्मोनल बदल किंवा इन्फेक्शनमुळेही डोळे सुजतात. रडण्यामुळे सुजलेले डोळे काही तासांत नीट होतात. पण जर इतर कारणे असतील तर वेळ लागतो.

अशा वेळी अनेकांची सवय असते की डोळे चोळण्याची. पण ही सवय टाळणे खूप गरजेचे आहे. डोळे चोळल्याने त्वचेवर आणि डोळ्यांच्या नाजूक भागावर ताण येतो, ज्यामुळे सूज आणखी वाढू शकते. हातांवर असलेले जंतू डोळ्यांत जाऊन संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तसेच सतत डोळे चोळल्यास डोळ्यांभोवती काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) वाढू शकतात आणि त्वचा सैल पडू शकते.

डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करता येतात. थंड पाण्याने डोळे धुणे, थंड कापड किंवा काकडीचे काप ठेवणे यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. पुरेशी झोप घेणे, भरपूर पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणेही महत्त्वाचे आहे. तसेच स्क्रीन टाइम कमी ठेवणे आणि डोळ्यांना वेळोवेळी विश्रांती देणे आवश्यक आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Puffy Eyes? It's Not Just Stress; 5 Reasons & Solutions

Web Summary : Puffy eyes are often due to lack of sleep, high salt intake, or allergies. Excessive screen time and dehydration can also contribute. Avoid rubbing eyes. Solutions include cold compresses, adequate sleep, hydration, and limiting screen exposure for relief.
टॅग्स : डोळ्यांची निगाहोम रेमेडीआरोग्यहेल्थ टिप्स